गावठी गवारीची परतलेली भाजी
परतलेली गावठी गवार
साहित्य
अर्धा किलो गावठी गवार
एक वाटी ओला नारळ
धनेजिरे पावडर
कडीपत्ता ताजा
मीठ,तिखट,गोड मसाला,
फोडणीचे साहित्य
कृती
गवार चिरून घेणे व गरम पाण्यात 5 मी ठेवणे
तेल तडतडल्यावर ,लालमोहरी,हिंग,हळद घालून,गवार टाकणे,परतणे,
वरून थोडे मीठ टाकून,परतणे,
झाकण ठेवून,5 मी,तिथेच उभे राहणे,कारण ही गवार वाफेवर पटकन शिजते,
५,मिनीटांनी झाकण काढून,नारळाचा खव टाकणे ,तिखट,गोडा मसाला टाकून परत भाजी हलवणे,
थोडा चवीचा अंदाज घेऊन,कमी वाटले तर मीठ टाकणे आणि आवडत असल्यास थोडा सुपारी एव्हडा गुळ टाकुन परत भाजी सगळ्या बाजूने परतून
गॅस बंद करणे आणि झाकण ठेवणे...
...आणि मग खाणे
वृषाली गोखले
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment