उपमाः-
उपम्याला उपमा नाही
हे तर सकाळचे पौष्टिक खाणे
बशीभर उपमा न्याहरीला
पाणी सुटते तोंडाला
काजू बेदाणे दिमतीला
गाजर,मटर चवीला
नारळ,कोथिंबीर शोभेला
शेव वरून भूरभूरायला
लिंबाची फोड बाजूला
अशा उपम्याला तोड नाही
उपम्याला उपमा नाही.
वसुधा आनंद करमरकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment