Tuesday, March 13, 2018

लिंबाची साल

लिंबाची साल

एकदा खूप लिंबे आणली होती लोणच्या साठी नाही तर रसासाठी .रस  तर काढला, सालाची एरवी पूड करते पण आज वेगळाच बेत ठरवला . साली चिरल्या नि त्यात मीठ घालून ऊन्हात ठेवल्या .साली मऊ झाल्या नि त्या  मिक्सरमधून फिरवून घेतल्या , त्यात साखर, मीठ ,तिखट घातलं चवीपुरतं . मस्त चविष्ट ठेचा बोटं चाखत चाखत खाल्ला.  ऊन्हात ठेवल्यामुळे एक वेगळीच चव येते लोणच्याला . वाया घालवायचं नाही हेही पाळलं गेलं . वेगवेगळे प्रयोग करताना मग मजा येते नि कंटाळा येत नाही स्वयंपाकाचा .

डॉ.वृंदा कार्येकर

लिंबूसाल ओली असतानाच त्या साखर तिखट जिरे मीठ घालून मिक्सर वरती बारीक केले (साल न वाफावता) आणि तयार चटणीत थोडा लिंबूरस टाकून किंचित चटका दिला अन गार करून काचेच्या बरणीत ठेवलं तर 2 महिने छान राहतं.

भार्गवी दीक्षित

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment