लोणचं!!
लोणचे करण्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा मी मसाला घरीच करून ठेवते .विकतच्या मसाल्यात हिंग तरी जास्त नाही तर मोहरी, माझं नाही जमत त्या तयार मसाल्याशी ,विकतची तर खारटच असतात लोणची, मी आणतही नाही ,खातही नाही . कोणाकडे गेले तर मी लोणचचं घेऊन जाते .
तर सांगणार आहे मसाल्या विषयी!!
पाव किलो मोहरी
मेथी२डाव
३पाऊणवाटी तिखट
२डाव हळद
हिंग चवीप्रमाणे
कृती
मी आधी हिंग व मेथी तळून घेते तेही कढईत, मोहरीच्या डाळीैऐवजी मोहरीच वापरते .तळलेली मेथी,हिंग तिखट व हळद मोहरी मिक्सरवर बारीक करून काचेच्या किंवा पत्र्याच्या डब्यात ठेवते .खूप दिवस टिकतो . लोणचं करताना ताज्या आमच्याच झाडाच्या कैऱ्या धुवून पुसून घेऊन मध्यम आकाराच्या फोडी करून त्यात मसाला मिसळते . हलवून एखादा दिवस ठेवते ,नंतर बोटाचे एक पेर वर येईल एवढे तेलाची फोडणी घालते . रोज हलवते . लोणचं तयार .ताजं ताजं छान लागतं . शिळं झालं की त्यात कणिक घालून त्याचे पराठे ,ते आमटीत, भाजीत घालून संपवून टाकते .
डॉ.वृंदा कार्येकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment