सफरचंद हलवा
साहित्य
सफरचंद एक की
खवा 350 ग्रॅम
साखर 250 ग्रॅम
वेलची पावडर अर्धा टीस्पून
बदाम काप,बेदाणे, काजू तुकडे
तूप चार टीस्पून
कृती
एक कढईत तूप घेऊन मंद गॅसवर तापत ठेवा.सफरचंद धुवून घ्या.
एक सफरचंदाची सालं काढा, फोडी करून बिया काढा.लगेच किसून तुपावर परता.
अशाप्रकारे एक एक सफरचंद सालं काढून किसून तुपात घाला.म्हणजे सफरचंद काळी पडणार नाहीत.
पाच मिनिटं तुपावर परता.आता त्यात साखर मिसळा.
साखर विरघळली की खवा घालून परता.
वेलची पावडर, बेदाणे, काजूगर घाला.परत पाच मिनिटं परता, पुरेसा घट्टपणा येऊ द्या.
बदामाच्या कापांनी सजवा.
वैशाली गोखले
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment