Monday, March 5, 2018

अंड्याचा पोळा!!

अंड्याचे ऑम्लेट - जरा हटके

💠साहित्य

•४अंडी
•१ कांदा
•१ ढोबळी मिरची
•२/३ मशरूम्स
•२ चिमटी मिरपूड
थोडे दूध
•चवीनुसार मीठ
•हळद
•कोथिंबीर

💠कृती:

⚫अंडी फोडून त्यात हळद, मीठ, मिरपूड आणि थोडेसे दूध (पाव कपापेक्षाही कमी) घालून हलके फेटून घ्या.
कांदा, मिरची, मशरूम्स, कोथिंबीर बारीक चिरून मिश्रणात घाला. परत सर्व मिश्रण फेटून घ्या. १ मिनिट मिश्रण मुरू द्या.

⚫तापल्या तव्यावर साजूक तूप घालून इतक्या मिश्रणाची २ ऑम्लेटस लावा.
मिश्रण टाकल्यावर लगेच तव्यावर झाकण ठेवा. (हे महत्वाचे आहे) आच मंद ठेवा.
खालची बाजू सोनेरीसर झाली की उलटवून १० सेकंद ठेवा आणि लगेच खायला घ्या.

⚫दुधामुळे ऑम्लेट चिजी होतं आणि सुरेख फुलतं. साधारण अर्धा पेर तरी होतं.

टीप:-

मशरूम्स च्या ऐवजी किंवा बरोबर पालक, मेथी, गाजराचा किस अशा भाज्या सुद्धा छान लागतात. प्रोटीन आणि फायबर दोन्ही एकत्र पोटात जातात आणि दिवसाची सुंदर सुरवात करून देतात.

दीप्ती पुजारी
धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment