अळूचं फदफद
भाजी च अळू स्वच्छ धुवून देठ सोलून बारीक चिरून घ्यायचं त्यात व्यंजन म्हणून घालायला मक्याची कणसं, शेंगदाणे, चण्याची डाळ, भिजलेले पावटे काहीही छान लागत. तर आता गॅस ऑन करून वर पातेली ठेवायची तेल तापत ठेवायचं तेल तापलं की त्यात मोहरी जिर हिरवी मिरची हिंग हळद घालायची नंतर शेंगदाणे , चण्याची डाळ, पावटे मक्याची कणसं घालायची चिरलेला अळू घालायचं झाकण ठेवून एक सणसणीत वाफ काढायची, नंतर चांगलं परतून घ्यायचं पातेल्यात वर आलेलं अळू खाली बसेल मग त्यात चण्याचं पीठ घालून चांगलं घोटून घ्यायचं परत एक सणसणीत वाफ काढायची आणि परत नीट घोटून घ्यायचं आता त्यात गरजे पुरत (व्यवस्थित पातळ होईल ) पाणी घालायचं मीठ गूळ आणि भरपूर चिंचेचा कोळ घालायचा नाहीतर अळू खाजत घश्याला, चांगलं फदफद असा आवाज येई पर्यंत उकळू द्यायचं बाजूला छोट्या कढई त भरपूर लसूण हिंगाची करून ती आळू मध्ये ओतायची झाकण ठेवायचं नाही तर फोडणी चा वास उडतो
अळूची भाजी
साहित्य
१०-१२ भाजीच्या अळूची पाने
२)१/२ वाटी शेंगदाणे
३)हळद
४)६-७ हिरव्या मिरच्या
५)२-३ लसणाच्या पाकळ्या
६)१/२ वाटी ओला खोबर
७)४ छोटे चमचे तेल
८)६ चमचे चिंचेचा कोळ
९)आवडीनुसार मिठ
कृती :
अळूची पान ४-५ तास हवेवर वाळू दयावीत. थोडीशी वाळली की एका पानाचे मधोमध दोन भाग करून त्याची सुरळी करून गाठ तयार करून घ्यावी. एका भांडयात तेल गरम करून त्यात लसणाच्या पाकळ्या थोड्याश्या ठेचून घालाव्या,लालसर झाल्या की हिरव्या मिरच्या घालाव्या. आता तयार केलेल्या गाठी घालाव्यात.
शेंगदाणे प्रेशर कुकरला लावून शिजवून घ्यावे. हे शेगदाणे,मिठ,हळद आणि थोडं पाणी गाठीत घालुन चिंचेचा कोळ घालून झाकण ठेऊन गाठी शिजू द्याव्या. जास्त पाणी घालू नये. जास्त शिजलेल्या गाठी बेचव होतात. खोबर घालावे.
रश्मी काजरेकर-पाताडे
🔺अळूची भाजी🔺
अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली.
बेसनपीठ घेतलं..त्यात हळद , मीठ , पांढरे तीळ , अर्धा चमचा लिंबूरस(दहीताकही चालतं)
लाल तिखट, ओवा घालून मिश्रण पाणी घालून सरबरीत करून घेतलं.
एक मोठं अळूचं पान पालथं ठेवलं पोळपाटावर..
त्यावर मिश्रण एकसारखे बोटांनी लावले त्यावर एक छोटे पान पालथे ठेवले.त्यावरही मिश्रण लावले .
*पानांची दोन्ही टोकं मध्यावर आणली.
*पानांना उभे धरून रोल केला.
*असे सगळ्या पानांचे रोल केले.
* मोदकपात्राला तेल लावले.
* त्यात सगळे रोल्स ठेवले.
मोदकपात्राच्याच आकाराच्या पातेल्यात थोडं पाणी घेतलं.
* पातेलं गैसवर ठेवून त्यावर मोदकपात्र ठेवलं.
* मोदकपात्रावर झाकण अशा पद्धतीने ठेवलं की वाफ जाणार नाही.
*साधारण पंधरा मि रोल्स उकडून घेतले.
* झाकण काढून रोल्सना हात लावून पाहिलं..( चिकटलं तर अजूनही उकडायला हवंय )
* भरपूर कांदा बारीक चिरला.
* कढईत पुरतं तेल टाकलं.
जिरं ,मोहरी,हिंगाची फोडणी दिली.
काळा मसाला आणि किंचीत मीठ टाकले आणि वड्या खमंग परतल्या.
सविता करंजकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment