Wednesday, March 7, 2018

सुरण,रताळ, शिंगाडे पीठ भाजी

सुरण,रताळी व शिंगाड्याचे पीठ याची परतून भाजी..

(उपवासाठी व इतर वेळीही)

साहित्य

पाव किलो सुरण,
पाव किलो पेक्षा कमी रताळी,
सुरण खाजु नये म्हणून 2,3 आमसुले,
पिठीसाखर,
शिंगाड्याचे पीठ(शिजलेल्या फोडीना लावायला..)
जिरे,
धने पावडर
मीठ व लाल तिखट
साजूक तूप
ताजा कडीपत्ता

कृती

सुरण व रताळी काचऱ्या करून,गरम पाण्यात 10 मी ठेवणे,
साजूक तूप कढईत घालून,गरम झाल्यावर,जिरे टाकणे..जिरे तडतडत असतानाच, कडीपत्ता, आमसूल व थोडे मीठ टाकणे आणि लगेच सुरण व रताळेच्या काचऱ्या टाकणे
बराच वेळ
(निदान 5 मिनटं तरी)उलथण्याने परतत राहणे,मग झाकण ठेवून 1,2 मि. वाफेवर शिजू देणे..
सुरण,रताळे लौकर शिजते.
मग झाकण काढून लालतिखट,शिंगाडा पीठ व थोडं मीठ ,पिठीसाखर(फोडणीत मीठ टाकलंय आपण आधीच, हे विसरायचे नाही)...घालून परतून,गॅस बंद करून,झाकण ठेवावे..

विशेष टीप

शिंगाड्याचे पीठ पेरताना,थोडेच वापरायचे..
काही लोकांना शिंगाडा उग्र वाटतो,

👇🏽या भाजीबरोबर गोड,सूंदर,घट्ट,दही खूप छान लागते..

कृती दही ऍड करू शकता...

वृषाली गोखले

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment