Wednesday, March 21, 2018

थालीपीठ

श्रीनिवास गोखले- थालिपीठाची भाजणी साहित्य

१किलो तांदूळ,
२०० ग्रॅम प्रत्येकी हरभरे,
काळे उडीद,
गहू ,व १५० ग्रॅम धने.

कृती

हे सर्व खमंग भाजावे.व दळून आणावे.
वर सांगितल्याप्रमाणे भाजणी करून घेतल्यावर,२ वाटी भाजणी,१ मोठा कांदा बारीक चिरून किंवा किसून घेणे,योग्य तेव्हडे मीठ,तिखट,मध्यम पळी भर शेंगतेल पाणी घालून जरा ओलसर घट्ट भिजवून गोळा करणे,पातेल्यात १ पळी तेल घालून भाजणीचा गोळा  सारखा थापायचा व मध्य भागी बोटाने ५-६ भोकं पाडून त्यांत शेंगतेल जरा-जरा भरायचे व मंद गॅसवर पातेले ठेऊन झाकण ठेवावे,वाफेबरोबर भाजणीचा वास आल्यावर ताटात पाडून झाऱ्याने आख्खे(दुसरी बाजू) उचलून पुन्हा पातेल्यात ठेऊन मंद गॅसवर ठेऊन करपण्याअगोदार अंदाजाने उतरवावे,झाले की नाही खमंग थालीपीठ !

टीप-त्यावर साईचं दही,लोणी/ साजूक तूप घरी कढवलेलं असेल तर उत्तम + फोडणीची मिरची/लसणीच तिखट

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment