Tuesday, March 20, 2018

चर्चा-आजची भाजी- नवलकोल

चर्चा-आजची भाजी- नवलकोल

♦️सुचिकांत-उद्या *नवलकोल* ही भाजी घेऊ या ... आज सर्व सदस्य पाककृती आठवून ठेवा.

♦️अंजली जोशी-पंजाबी पद्धतीची नवलकोलाची भाजी

एकदम सोपी आणि छान..
हिरव्या हिरव्या पानांचे कोवळे नवलकोल .स्वच्छ धुवून घ्या.पाने बारीक चिरून घ्या नवलकोल सारे काढून बारीक चिरून घ्या.अथवा
पानं आणि सालं काढलेले नवलकोल तुकडे एकत्र food processor मधून काढा
Pressure pan मध्ये फोडणी साठी तेल गरम करून घ्या.तेल तापले की त्यात थोडी मोहरी , आणि खूप हिंग, मिरच्या घालाव्यात.त्यात बारीक चिरलेला नवलकोल आणि पाला घालावा.मीठ आणि पाणी घालावे.
दोन तीन शिट्ट्या झालेल्या की भाजी तयार.
कुठल्याही मसाल्या ची, आले लसूण धने जिरे गरज नाही फक्त
हिंग.. भरपुर
मीठ मिरची
सुंदर भाजी होते
नक्की try करा😄🙏🏻

♦️अर्चना :-नारळासारखा खव़ून घ्यायचा मीठ दाण्याचे कूट लिंबू पिळायचे नारळ कोथिंबीर थोडेसे, वरूनमिरची कढीपत्ता जिरे मोहरी घालून खमंग फोडणी तेलाची!

♦️दीपाली प्रसाद:-नवलकोल किसून घेणे, तेलावर फोडणीला जीरे-मोहरी, हलद, हिंग, मिरची, कढिपत्ता घालून अर्धी वाटी भिजवलेली मूग डाल घालून एक वाफ घेणे, त्यावर किसलेलि नवलकोल, मीठ घालून चांगला शिजवून घेणे.

♦️वृषाली गोखले:-नवलकोल ची साले मात्र नीट काढावी लागतात,नाहीतर तंतू राहिले तर,खाताना
मजाच जाते,
आणला की तो फ्रीझ मध्ये अगदी फार फार तर एक दिवस च ठेवायचा..
नवलकोल ची साले पाण्यात उकळून त्या पाण्याचा वाफारा घेतला तर,घशातील कफाचा चिकटा जातो,त्याच पाण्याने गुळण्याही करायच्या

♦️ज्योती खांबेटे: नवलकोल बारीक चिरून हरभराडाल घालून देखील भाजी करता येते

♦️शर्मिष्ठा-नवलकोल बारीक चिरून घ्यायचा आलं-लसूण पेस्ट गरम मसाला सर्व तेलावर घालून फोडणी करायची मग भिजवून ठेवलेले सोडे घालायचे मिठ तिखट चवीप्रमाणे. थोडा नारळाचा चव घालायचा व मग छान रटरटू द्यायची भाजी. सोडे घालून नवलकोलाची भाजी मस्त लागते.

♦️वंदना मंकीकर:- सोडे घातले कि त्या मधे कोकम घालाव

♦️शर्मिष्ठा:- हो. आंबट गोड छान चव येते.

♦️अस्मिता भस्मे: फिंगरचिप्ससाठी बटाट्याचे काप करतो त्याप्रमाणे नवलकोलच्या फोडी करुन घ्याव्यात. कांदा उभा    चिरून घ्यावा.फोडणीमधे मोहरी जीरं हिंग हळद कढीपत्ता टाकावा.कांदा घालून थोडेसे परतावे. नवलकोलच्या फोडी घालाव्यात. तिखट मीठ घालून थोडेसे परतावे. छान कुरकुरीत लागते भाजी. कुरकुरीत नको असेल तर वरती झाकण ठेवून चांगली वाफ आणावी.

♦️रश्मी गांधी:-नवलकोल कोवळा आहे की नाही हे कसे ओळखायचं

♦️वृषाली गोखले-सालावरून कळते

♦️ज्योती खांबेटे: नखांनी  दाबून बघायचे नवलकोल कोवला आहे की नाही शक्यतो छोटे छोटे घ्यावे

♦️अंजली जोशी:- Chennai कडे कढीपत्ता, मिरची आणि ओलं खोबरं यांच्या वाटणाची सुखी भाजी करतात.हळद न घालता.
गाजर आणि नवलकोल किसुन दही घालून कोशिंबीर करतात.परदेशात salads मध्ये वापरतात.

♦️अस्मिता भस्मे: नवलकोल शिजवून कांदा टोमॉटो घालून बटाट्यासारखी रस्सा भाजी पण छान होते. यात थोडी दालचीनी ठेचून घालायची.

♦️अंजली जोशी: त्यात बटाटे पण घालतात.

♦️अस्मिता भस्मे: आवडीनुसार

♦️वृषाली गोखले:- नवलकोलची पाने ( पिवळी झालेली नकोत)
पातीचा कांदा व कांदा पात.. यांची सुखी भाजी मुगाचे पीठ पेरून!

साहित्य

बारीक चिरलेला पातीचा कांदा,नवलकोल ची पाने व पात,लालतिखट व हळद,हिंग,मीठ,
मुगडाळीचे पीठ,जिरे,आवडत असेल तर थोडी पिठी साखर,मोठ्या बुडाची कढई,

कृती

कढईत फोडणीत तेल नेहमीपेक्षा जास्त घालणे,जिरे तडतडल्यावर हळद,हिंग घालून,बारीक चिरलेले सर्व साहित्य घालणे व 5,7 मिनिटे उलथण्याने परतून,झाकण दाबून ठेवणे(5 मिनटं )..वाफेवर सर्व साहित्य मिळून येईल.
मग लाल तिखट,मीठ व मूग पीठ पेरून,(आवडत असेल तर आत्ताच थोडी पिठी साखर घालणे )
परत चांगले 5,7 मिनटं
परतणे,सर्व एकजीव झालेले दिसेल,गॅस बंद करून,झाकण दाबून ठेवणे व 15,20 मिनटं वाफ मुरू द्यावी..
सुरुवातीलाच तेल जास्त टाकलेले आहे,त्यामुळे
पीठ पेरताना खूप नाही घालायचे नाहींतर कोरडी होईल भाजी,ताज्या पोळीबरोबर
(थोडे साजूक तूप गोडेतेला ऐवजी लावणे ) खायला मजा येते
भाजी किंचित तिखटच
करावी!या दिवशी जेवणात,साधे वरण,भात, लिंबू/आंबा लोणचे घ्यावे,उडदाचा पापड व दही/ताक हेही असावे!

♦️वृषाली गोखले:- नवलकोल च्या फोडी,टोमॅटो व सिमला मिरची..मिक्स भाजी!

साहित्य
बारीक चिरलेल्या नवलकोल च्या फोडी(तंतूंच्या गाठी नकोत ),
बारीक चिरलेला टोमॅटो,सिमला मिरचीचे जरासे मोठे तुकडे,काळी मोहरी,
तमालपत्र छोटी 2,3/दालचिनी 1/लवंग 1
हळद/हिंग /लालतिखट /मीठ/गुळ (फक्त चवीपुरता),सुक्या खोबऱ्याचा किस/ओल्या नारळाचा किस(either/or ),कढई किंवा खोलगट भांडे..

कृती

फोडणीत लालमोहरी तडतडल्यावर,तमालपत्र दालचिनी,लवंग घालून,मोठ्या चमच्याने हलवून, चिरलेले साहित्य घालणे.वरती झाकण म्हणून थाळा घेऊन,त्यात दोन वाट्या पाणी घालणे..जरा  लक्ष ठेवून अंदाजाने 5,7 मिनिटानंतर फोड शिजल्याची खात्री झाली की,
लालतिखट/किस/गुळ(चवीपुरता,टोमॅटोचा आंबटपणा जाईल इतपत),घालून गॅस बंद!

सहभागी सदस्यांचे आभार!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment