Monday, March 5, 2018

ऑल परपज आटा-तिखट पुरी

   आॅल परपज मल्टिग्रेन आटा

साहित्य:-

१ वाटी मूग,मटकी,चवळी,मसूर, हरभरे,हिरवे चणे, मटकी किंवा घरात असतील ती कडधान्ये
१/२वाटी सोयाबीन
१/४वाटी गहू
१/४वाटी उडीदडाळ/अख्खे उडीद
२वाट्या तांदूळ
१वाटी धने

कृती:-

सगळ एकत्र करून रवाळ दळून आणावं
घावन,ठेपले,थालिपीठ काहीही करता येते.पाहीजे त्या  पालेभाज्या,न खाल्ल्या  जाणा-या भाज्या त्यात घालून काहीही करता येत.

तिखट पुरी          

गव्हाचे पीठ,मीठ, लाल तिखट तीळ ओवा कोथींबिर बारीक चिरून सर्व एकत्र मिसळुन कणिक मळावी. चपाती प्रमाणे पातळ लाटून कडक तळावे.यात हवे असल्यास पालक पेस्ट, टोमॅटो किंवा कोणत्याही भाजीची पेस्ट घालू शकता. झटपट तयार होते.

डॉ.तृप्ती लोणकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment