टोमॅटो सफरचंद चटणी
साहित्य:
४ मध्यम आकाराचे टोमाटो
३ मध्यम आकाराचे सफरचंद
४ पाकळ्या लसूण
१ कप साखर
१/४ टी स्पून मोहरी
२ लहान आकाराचे कांदे
मीठ चवीने
कृती:
लसूण व मोहरी बारीक वाटून घ्या. टोमाटो , कांदा बारीक चिरून घ्या. सफरचंद सोलून चिरून घ्या.
एका कढईमधे वाटलेले लसूण, चिरलेला टोमाटो, कांदा, सफरचंद साखर मीठ घालून मिक्स करून चांगले शिजवून घ्या.
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
ज्वारी ची इडली
१ कप तांदूळ
१ कप उडीदडाळ
१ कप ज्वारी
१ कप रवा
एक चिमुट सोडा
मीठ चवीने
तेल
कृती:
प्रथम तांदूळ, उडीदडाळ, ज्वारी, धुऊन ७-८ तास वेगवेगळे पाण्यात भिजत ठेवा. मग मिक्सरमध्ये जाडसर वाटुन घ्या. वाटुन झाल्यावर त्यामध्ये रवा मिक्स करून मिश्रण परत ७-८ तास झाकून ठेवा. (सकाळी नाश्त्याला इडली बनवायची असेल तर आधले दिवशी सकाळी धान्य भिजत घालून संद्याकाळी वाटावे मग त्यामध्ये रवा घालून मिक्स करून दुसऱ्या दिवशी सकाळी इडली बनवावी.)
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये मीठ व सोडा घालून मिक्स करून एक तास मिश्रण परत बाजूला ठेवा. एक तासाने कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवावे व इडली पात्राला तेलाचा हात लाऊन मिश्रण घालावे.
कुकर मधील पाणी गरम झालेकी इडली पात्र कुकरमध्ये ठेऊन झाकण लाऊन शिटी काढून घ्यावी. इडलीला १०-१२ मिनिट वाफवून घ्या. मग कुकरचे झाकण काढून इडली काढून घ्यावी.
गरम गरम इडली चटणी अथवा सांबर बरोबर सर्व्ह करावी.
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
"उकडपेंढी"
कणीक व ज्वारीचे पीठ एक एक वाटी समप्रमाणात घ्यावे.सुरुवातीला मंद आचेवर कोरडे गुलाबीसर भाजून घ्यावे. नंतर शक्यतो शेंगदाणे तेलात नेहमी प्रमाणे कांदा (ओल्या कांद्याची पात)लसूण घालून फोडणी करावी, शेंगदाणे पण टाकावे, नंतर गरम पाणी अंदाजाने थोडे थोडे टाकावे. दही/ताक मीठ चवीपुरती साखर व तीळ घालावे. तीळामुळे चवदार होते. शेवटी खोबरं कोथिंबीर.....
काही जण शेवटी पुन्हा एकदा थोडे शेंगदाणे तेल टाकतात, आपल्या आपल्या आवडीनुसार...
विजया गोखले
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment