मसाले भात-लेख
गुढीपाडव्यादिवशी केलेला मसालेभात उरलेला...बराच होता...रात्री फ्रीजमध्ये ठेवावा असा विचार होता...पण फ्रीजमधलं अन्न खाण्याला आमच्या घरात तीव्र विरोध..
कंटाळा आलेला...तरीही दुपारी आवरल्यावर लगेचच तो भात पुन्हा एकदा पुरतं तेल जिरं-मोहरी घालून थोडं सढळ हस्ते तिखटमीठ घातली ,भरपूर कोथिंबीर चिरून घातली.ओल्या
हाताने चांगले मळून घेतले..
एका ताटाला तेल लावले आणि त्या ताटात भाताचे नाजूक आकारातले सांडगे घातले आणि ताट दिलं ठेवून कडक उन्हात..
अर्थातच ताटावर तलम ओढणी टाकली धूळ बसू नये म्हणून...
त्यादिवशी चार तास उन लागलं आणि दुसऱ्या दिवशी थोडंफार...
संध्याकाळी चटकमटक खायच्या वेळी खडखडीत वाळलेले मसाले भाताचे सांडगे तळले...
झाला की चट्टामट्टा !!
आता लवकरच मसालेभात करून उरवायची ऑर्डर आलीय...
फक्त एक चूक झाली...
गडबडीत फोटो काढायला विसरले..
असो..लवकरच फोटो ही पाठवेन.
पण त्याआधी तुम्ही करून पहायला विसरू नका.
धन्यवाद
सविता करंजकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment