♦️रश्मी पाताडे -भेंडीची भाजी
नुसती कांदा न घालता फोडणीत मोहरी जिर हळद थोडं हिंग घालायचं भेंडीच्या कचऱ्या घालायच्या आणि लिंबू पिळून, मीठ साखर घालायची चवी प्रमाणे झाकण ठेवायचं 5 मिनिट बारीक गॅसवर शिजू द्यायची आणि नंतर ओल खोबर घालून गॅस थोडा मोठा करून मस्त चरचरीत परतून घ्यायची गॅस बंद करून पोळी बरोबर खायची.
झटपट थोड्या साहित्यात मस्त भाजी होते
झटपट थोड्या साहित्यात मस्त भाजी होते
♦️अश्विनी ब्राह्मनाथकर -भेंडी स्नॅक्स
मी भरलेली कुरकुरीत भेंडी स्नँक्स म्हणुन करते... किंवा खिचडी, भाताबरोबर पण मस्त लागते....
आकाराने लहान आणि कोवळी भेंडी देठ आणि दांडे तोडुन घेऊन मध्ये उभा चिरा देते. त्यात शेंगदाणे कुट, हळद, मीठ, तिखट, हिंग, चिमुटभर साखर आणि मँगी मसाला ए मँजीक मिसळुन त्यात थोडे तेल टाकते . हा मसाला तयार भेंडी मध्ये भरुन Microwave मध्ये High Power वर चार ते आठ मिनीटे लावते. मधे मधे उघडुन पाहावे लागते.
गरम असताना कुरकुरीत वाटत नसली तरी थंड झाल्यावर मस्त होते....

♦️दीप्ती पुजारी-लिंबूभेंडी सार
माझ्या आज्जीच्या पद्धतीचं
१५० ग्रॅम भेंड्या उभ्या चिरून घेणे.
एखाददुसरी हिरवी मिरची उभी कापून
लसूण पाकळ्या चवीनुसार.
फोडणीमध्ये लसूण गुलाबी रंगावर आले की मोहरी, मेथ्या(१ चिमूटभर), जिरं, हिंग, हळद, मिरच्या घालाव्यात.
भेंड्या २ मिनिट परतावाव्यात.
३-४ग्लास गरम पाणी घालावे.
मीठ चवीनुसार.
भेंड्या शिजल्या की आवडीनुसार १ ते १.५ लिंबू पिळून टाकावे. एक उकळी आली की आच बंद करावी.

गरमागरम सार आणि ज्वारीची भाकरी त्यात चुरून किंवा मुगाची बिन फोडणीची खिचडी आणि लसणाचे तिखट - स्वर्गीय अनुभूती होते.
♦️रश्मी पाताडे -भेंडी च भरीत ( झटपट रेसिपी)
साहित्य:-
पावकिलो भेंडी, १ वाटी दही, २-३ हिरव्या मिरच्या, चवी प्रमाणे मीठ, साखर,
फोडणीच साहित्य : तेल किंवा तूप, जिर, हिंग.
कृती:-
भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावी. नंतर तिचे थोडे मोठे मोठे तुकडे करावे आणि कुकर बरोबर च कुकुर ला पाणी न घालता उकडवून घ्यावे, नंतर भेंडे थोडे गार झाल्यावर त्यात मीठ साखर घालून त्यात दही घालावं आता गॅस वर फोडणी पात्र ठेवावे त्यात तेल किंवा तूप ( तुपाची टेस्ट भारीच लागते) घालून त्यात जिर , , मिरची चे तुकडे घालावे मिरची खरपूस झाली की गॅस बंद करून हिंग हळद घालावी आणि ही फोडणी भेंडीत ओतावी आणि सगळं नीट चमच्याने ढवळून घ्यावे.भाजी ला उत्तम पर्याय होऊ शकतो .
♦️सुजाता जुमळे -मसाला भेंडी
कृती:-
भेंडीचे आधी दोन भाग उभे करून एक इंचाचे काप करून घ्यायचे.. त्यानंतर ते तेलात सोनेरी होईपर्यंत तळून बाजूला काढून ठेवायचे..
एका कढईत किंवा पातेल्यात तेल तापत ठेवायचे.. त्यात हिंग, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करायची.. त्यात बारीक चौकोन चिरलेला कांदा घालायचा.. तो थोडा पारदर्शक होईपर्यंत परातवायचा.. त्यानंतर त्यात बारीक चिरलेले २ मोठ्ठे टोमॅटोच्या फोडी घालून छान परतावायचे.. त्यातच आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावायचे..
मग त्यात तळून बाजूला ठेवलेली भेंडी घालून परतावायचे आणि ५ मिनिट झाकण ठेवून एक वाफ काढायची..
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम फुलका किंवा पराठ्यांसोबत सर्व्ह करायची..

♦️डॉ.वृंदा कार्येकर-चिंच गुळाची भेंडी
भेंडीची भाजी चिंच गुळाची ,ताकातील , पीठ पेरून (काचऱ्यांना ,)चिर पाडून पीठभरून ,करते ,माझे एक काका बडोद्याला भेंडी स्वस्त मिळते म्हणून खूप आणायचे. बहिणीला खूप भेंडी आवडते . मग मी ४/५प्रकारे भाजी केली हेही आठवतयं . भेेंडी ऊभी
चिरून केली तर चिकट होत नाही पुरवठ्याला येते .कधी कांदा घालून वाढवता पण येते . चवीत फरक पडतो तोही कळतो. , दही भेंडी हाही एक छान प्रकार आहे भेंडी वाफवून ,परतून दह्यात घालायची फोडणी द्यायची तर द्या ,नाही दिली तरी चालेल . कांदा किंवा टोमॅटो किंवा बटाटा घालूनही वाढीव भाजी होते .
गंमत म्हणजे प्रत्येक लहान मुलांची आवडती भाजी भेंडीच असते .
भेंडी वाळवून नंतर तळून दह्यातही घालतात . बाकीचं सर्व आलयं लिंबू आमसूल वगैरे .

♦️सुचेता दरपे-भरली भेंडी
साहित्य
अर्धा किलो भेंडी, ओले खोबरे, शेंगदाणे कूट,हळद,हिंग,मीठ,लिंबाचा रस,तेल,
कृती:-
ओले खोबरे किसून घ्या,त्यात शेंगदाणा कूट,हळद,हिंग मीठ,लिंबाचा रस घालून मिश्रण करून घ्या,भेंडी धुवून कोरडी करून उभी चिरून त्यात मिश्रण भरा आणि तव्यावर मंद आचेवर ठेवा.
♦️अभिलाषा शिंपी-भेंडी काप
भेंडीचे पातळ काप करून घेऊन त्यात बेसन , तिखट , आमचूर पावडर , मीठ लावून थोडावेळ ठेवून नंतर तळून काढावी सोनेरी रंगावर म्हणजेच कुरकुरीत होईपर्यन्त आणि नंतर नुसतीच खावी स्नॅक्स म्हूणन छान लागते.
♦️वृषाली गोखले-डाळभेंडी
साहित्य
पाव किलो भेंडी.पातीचा कांदा,उभा चिरलेला,बारिक चिरलेली पात ,भिजवलेली हरभरा डाळ,लाल तिखट,हळद,आमसूल,मीठ,पिठीसाखर,फोडणीचे साहित्य.
कृती
मोठी भेंडी आणणे.दोन टोके काढून,मध्ये चिरून,फक्त 2 भाग करणे, मोठी कढई तेल गरम झाले की लाल मोहरी टाकून,भेंडी टाकणे, परतणे,अमसुल व भिजलेली डाळ घालून,झाकण ठेवून,१/१ मिनीटांनी ,उलथण्याने ,भेंडी फिरवत राहणे,परत झाकण ठेवून,एक वाफ देणे...व आता चिरलेला कांदा व पात टाकणे,खूप वेळ परतत राहणे व बाजूने तेल सोडून,डाळ शैली का बघणे व शिजली असेल तर लाल तिखट,मीठ व पिठीसाखर घालून छान, सगळीकडून परतणे...गॅस बंद करून,पूर्ण भाजी दाबली जाईल अशी ताटली झाकण म्हणून ठेवणे...
तेल जास्त लागते डाळ भेंडी करायला..
तेल जास्त लागते डाळ भेंडी करायला..
♦️डॉ. वृंदा कार्येकर -ताकतील भेंडी
पाव किलो भेंडी घ्या ,नेहमी सारखी काप करून फोडणीला टाका . त्यात भेंडी शिजत आली की ताक किंचित आंबट असेल तर घाला . गूळ नको साखर घाला. मीठही घाला .एक वाफ.द्या . कधीतरी भेंडी चिकट होते पण चवीला मस्त लागते.भेंडी ताजी आहे का हे ओळखण्याची खुण. भाजी ३मिनिटात शिजते एक वाफ म्हणजे 3मिनिट मी निरीक्षण करून गणित जमवलयं
.फ्रीजमधे ४८तास ताजेपणा राहू शकतो .त्यानंतर भाजी शिजवायला वेळ लागतो . म्हणजेच भाजी शिळी झाली .
.फ्रीजमधे ४८तास ताजेपणा राहू शकतो .त्यानंतर भाजी शिजवायला वेळ लागतो . म्हणजेच भाजी शिळी झाली .
♦️भार्गवी दीक्षित-दह्यातली भेंडी
साहित्य:
भेंडी अर्धाकिलो
दही (घट्ट) १ वाटी
दाण्याचा कूट १/४ वाटी
जिरे धणे पूड
तिखट मीठ हळद
दही (घट्ट) १ वाटी
दाण्याचा कूट १/४ वाटी
जिरे धणे पूड
तिखट मीठ हळद
कृती:
भेंडी स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्यावी
भेंडी कोवळी आणि आकाराने लहान असावी
भेंडीचे देठ आणि खालचे टोक कापून त्याला उभी चिर द्या
भेंडी कोवळी आणि आकाराने लहान असावी
भेंडीचे देठ आणि खालचे टोक कापून त्याला उभी चिर द्या
जाड बुडाच्या पातेल्यात किंवा नॉनस्टिक पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी जिरे चांगले ताडतडले की किंचित हिंग टाकुन भेंडी त्यात परतून घ्या
भेंडी कुरकुरीत झाली की त्यात हळद,तिखट, मीठ, धनेजिरे पावडर (सर्व चवीनुसार) टाकून नीट परतून घ्या
तयार भेंडीत वाटीभर दही फेटून टाकून त्यावर शेंगदाणे पूड मिसळून परतून घ्या..
झाकण न झाकता भाजीला एक वाफ येऊ द्या..
दह्यातली भेंडी खायला तयार.
दह्यातली भेंडी खायला तयार.
♦️भार्गवी दीक्षित-भेंडर दाण्याचा ठेचा
खेड्यात गावरान भेंडी मिळते जी काटेरी असते आणि आतील बिया जाडसर असतात.
ही भेंडी पांढरट रंगची असते, याला आम्ही भेंडर म्हणतो..
ही भेंडी पांढरट रंगची असते, याला आम्ही भेंडर म्हणतो..
काटेरी भेंडी घेऊन हलक्या हाताने त्याच्या आतील बिया काढून घ्या.
(शुभ्र मोत्या सारख्या दिसतात)
वाटीभर या बिया,
२,४ मिरच्या हिरव्या
१ पाकळी लसूण
जिरे
मीठ
(शुभ्र मोत्या सारख्या दिसतात)
वाटीभर या बिया,
२,४ मिरच्या हिरव्या
१ पाकळी लसूण
जिरे
मीठ
कृती:
भेंडीचे दाणे
लसूण पाकळी
हिरवी मिरची
किंचित तेलावर नीट वाफवून घ्या ( पातेल्यावर ताट झाकून, नाहीतर दाणे ताडतडून बाहेर येतात)
२,४ मिनिट मिनिटांनी मिश्रण थंड होऊ द्या( अजूनही ताट झाकूनच)
मीठ जिरे किंचित लिंबू दाण्याचा कूट टाकून सर्व मिश्रण मिक्सर वरती फिरवून घ्या.
वरतून मस्त फोडणी टाकून ठेचा आणि भाकरी मनसोक्त उपभोग

♦️वैशाली पाटील-तव्यावरील भेंडी
भेंडर म्हणजे निबर झालेल्या भेंबीच्या बीया.....
मक्याचे दाणे ज्याप्रकारे गरम तव्यावर तेल मीठ टाकून चविष्ट करून खातो तसे आम्ही अशा भेंडी बीया मजेने खातो
♦️सागर महाजन-भेंडीच लाळ
साहित्य :
काटेरी भेंडी पावकिलो , हिरव्या मिरच्या , भाजुन सोललेले शेंगदाणे , फोडणीसाठी तेल ,जीरे , लसुण पाकळ्या ७/८ , पाव टिस्पुन हळद ,मीठ .
कृती :
भेंडी धुवुन थोडी बारीक चीरुन घ्या . थोडा त्रास होतो एकीकडे मिक्सर मध्ये मिरच्या , शेंगदाणे बारीक वाटुन त्याच वाटण करुन घ्या .कढईत तेल गरम करुन त्यात कढीपत्ता ,जीरे , लसुन याची फोडणी तयार करा त्यात चिरलेली भेंडी घालुन एकदाच परतवा त्यावर झाकण घालुन २ मिनीट वाफवुन घ्या नंतर भेंडी शिजत आलीय अस दिसताच त्यात तयार वाटण टाकुन रस्सा करुन घ्या व चांगली उकळी येऊ द्या परतवते वेळीच यात हळद,मीठ घालुन घ्या . बाजरीच्या भाकरी बरोबर खुप छान लागत हे लाळ
♦️उमा राजन भसे-भेंडी च्या दाण्यांचा ठेचा♦️
सर्वांना प्रश्न पडलाय की खुप भेंड्या लागतील?
हो लागतील च परंतू यावर एक सोपा उपाय आहे.
बाजारात गेल्यावर कोवळ्या भेंडी च्या जवळ फिरकायचे पण नाही,
जेथे जाडी जुन भेंडी असेल त्या भाजी वाला किंवा वालीला तुमची भेंडी छान आहे, कशी दिली जरा जास्त पाहीजे वगैरे वगैरे मग विक्रेता एक किलोच्या भावात आपल्याला दोन किलो देतो, व मनात म्हणतो खा मेल्या आता बायकोच्या शिव्या.आणि घरी येऊन मस्त भेंडी तले दाणे काढत बसायचे. व भाजी घेण्यात आपण हुशार आहोत, हे भाजी वाल्याला कधीच कळू द्यायचे नाही.

प्रथम मिक्सर मधुन बिया जाडसर वाटाव्यात, नंतर त्या काढून बाजूला ठेवून, परत मिक्सर मधे अंदाजे लसूण हिरव्या मिरच्या वाटून घ्या कोथिंबीर व कढीपत्ता पण वाटूनच घ्यावा हे मिश्रण बारीक वाटावे व कढई तापल्यावर तेल मोहरी आणि हिंग घालून फोडणी करावी व हे सर्व छान वाफ निघेपर्यंत परतावे, व भाजलेल्या शेंगदाण्याचे थोडे कुट व त्यावर थोडे लिंबू पिळून अंदाजे मिठ घालून हलवून गॅस बंद करावा. व थंड झाल्यावर पोळी, किंवा भाकरी बरोबर खावे.
दुसरे दिवशी जास्त छान लागते.
दुसरे दिवशी जास्त छान लागते.
♦️सौ वैशाली -कसाभेंडी ♦️
निबर कडूवाळूक (कडूहिरवी काकडी) ज्याला गावाकडे दाडादोडा म्हणतात घ्यावे व त्याचे एकेक इंचाचे काप करावेत.
दोन-तीन लिटर पाणी घ्यावे.त्यात ते कापलेले वाळकाचे काप टाकावे.त्यात हळद,मीठ,जवस कच्चे कुटून घालावे.हे भांड्यात घालून झाकून दिवसभर उन्हात ठेवावे.रात्रभर गार झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी पिण्यास तयार होईल.
उन्हाळ्यात थंड व पौष्टिक पदार्थ खूप उत्तम आहे.
त्यात आवडीनुसार गाजर घालतात.
उन्हाळ्यात थंड व पौष्टिक पदार्थ खूप उत्तम आहे.
त्यात आवडीनुसार गाजर घालतात.
सहभागी अन्नपूर्णेंचे आभार!
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment