Tuesday, March 13, 2018

कारल्याची सोप्पी भाजी

कारल्याची सगळ्यात सोप्पी भाजी

साहित्य:

कारले
चिंच
गूळ
तिळाची पूड किंवा
शेंगदाणे पूड
जिरे धणे पावडर
तिखट/हिरवी मिर्ची
हळद
मीठ

कृती:

फार कडवट चव आवडत नसल्यास कारले गोल चकत्या चिरून त्याला किंचित हळद आणि मीठ टाकून अर्धतास ठरवून देणे.

त्याला पाणी सुटले की घट्ट पिळून घेऊन मोकळे करून ठेवणे.

कडवट चव आवडत असेल तर फक्त कारले गोल चकत्या करून बिया काढून घेणे.

पाव किलो कारली असतील तर साधारण मोठ्या लिंबाच्या एकदा गूळ खडा आणि साधरण तेवढ्याच आकाराचा चिंचेचा गोळा घेणे आणि एकत्र भिजवून ठेवणे.

१० मिनिटांनी  चिंच गुळाचा एकत्र कोळ काढून घेणे

जड बुडाच्या भांड्यात मोहरी जिऱ्याची हिंग टाकून फोडणी करून त्यात कारली परतून घेणे.

खरपूस परतून झाली कारली की त्यात तिखट मीठ हळद टाकून एक हात परतून त्यात चिंचगुळाचा कोळ, तिळाचा कूट, जीरेधने पावडर टाकून मस्त तेल सुटे पर्यंत अगदी मंद आचेवर शिजवून घेणे..
भाजी तयार आहे, आवडत असेल तर कोथिंबीर वरून वापरा.

भार्गवी दीक्षित

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

कारले.. परतलेली भाजी

साहित्य

लांबट कारली,पाव किलो, भरपूर कडीपत्ता,गुळ, आमसूल ५० ग्रॅम,

जिरे,ओल्या नारळाचा चव अर्धी वाटी,
मीठ,थोडे तिखट ( पाव किलोला 2 चमचे)

कृती

कारल्या ला खूप काटे असतील तर काढणे,
पातळ चकत्या करून,मिठाच्या गरम पाण्यात धुणे,दोन्ही हातानी,१-२ वेळा सगळ्या चकत्या चोळणे,फक्त अतिरिक्त कडूपणा जाईल, इतपतच!
बिया आठवणीने काढणे

मोठ्या कढईत, तेल व जिरे टाकणे(हिंग नाही )
कडीपत्ता टाकणे, चकत्या टाकणे आणि २ ते ३ मिनटं गॅस मोठा ठेवून,खरपुस परतणे
तेल नेहमीपेक्षा जास्त
गॅस बारीक करून अमसुल,खोबरे टाकून झाकण दाबून ठेवणे,साधारण एक मिनिटाने झाकण काढून,गूळ (आवडत असेल तरच ) टाकणे,थोडे
परतुन घेऊन,गॅस बंद व झाकण दाबून ठेवणे
फुलक्या बरोबर खाणे

वृषाली गोखले

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment