Friday, August 31, 2018

संकलन:-७

नमस्कार!*

असे म्हटले जाते की एखाद्याच्या काळजात घर करायचे असेल तर त्याचा मार्ग पोटापासून सुरू होतो. *म्हणूनच मराठीचा ठसा सर्वांच्या काळजावर उमटविण्यासाठी आम्ही अन्नपूर्णा या समूहाची स्थापना केली.*

*मराठी जितकी वापरली जाईल तितका तिचा प्रचार आणि प्रसार होईल या मताला धरून आम्ही महाराष्ट्रभरातील विविध भागातील पाककृती  आणि त्यातील पदार्थांची नावे या समूहातून संकलित करून तुमच्या पुढे सादर करीत आहोत.*

*संकलन:-७*

🔷 *बाळंतिणीचा आहार*
http://adheepotoba.blogspot.com/2018/07/16_28.html

🔷 *वालाच्या भाज्या* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/16_30.html

🔷 *गूळ पापडी वडी*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_88.html

🔷 *सुके मासे-जवळा, करंदी, खेकडा..*. http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_49.html

🔷 *कटलेट* http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_17.html

🔷 *उकडीचे गुळसाखर मोदक* http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post.html

🔷 *आइस्क्रीम* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/13.html

🔷 *बारधानी धपाटे* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/17.html

🔷 *बकलावा* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_43.html

🔷 *सांबार* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/12.html

🔷 *मुगा गाठी* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_84.html

🔷 *तांदूळ वड्याचे पीठ* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_66.html

🔷 *झुणका* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_73.html

🔷 *खीर...विविध प्रकार* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_0.html

🔷 *सूप* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/1_30.html

🔷 *पनीर स्टफड् आलू टिक्की* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_97.html

🔷 *मिक्स उसळ* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_51.html

🔷 *लेख-लसूण* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_16.html

*सर्व समूह सदस्यांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#अन्नपूर्णा*

संकलन:-६

*नमस्कार!*

असे म्हटले जाते की एखाद्याच्या काळजात घर करायचे असेल तर त्याचा मार्ग पोटापासून सुरू होतो. *म्हणूनच मराठीचा ठसा सर्वांच्या काळजावर उमटविण्यासाठी आम्ही अन्नपूर्णा या समूहाची स्थापना केली.*

*मराठी जितकी वापरली जाईल तितका तिचा प्रचार आणि प्रसार होईल या मताला धरून आम्ही महाराष्ट्रभरातील विविध भागातील पाककृती  आणि त्यातील पदार्थांची नावे या समूहातून संकलित करून तुमच्या पुढे सादर करीत आहोत.*

*संकलन:-६*

🔷 *चिकू स्मूदी* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_22.html

🔷 *गुळाचा सांजा* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_76.html

🔷 *लेख-पोळी* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_98.html

🔷 *पपई बर्फी* http://adheepotoba.blogspot.com/2018/05/2.html

🔷 *काकडीचे थालीपीठ* http://adheepotoba.blogspot.com/2018/05/blog-post_37.html

🔷 *बाळाचा खाऊ* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_53.html

🔷 *शंकरपाळी* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/8.html

🔷 *बेसन सुरळी* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_27.html

🔷 *काजूचा सरबत* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_4.html

🔷 *लोणचे* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/5.html

🔷 *मुटके* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_44.html

🔷 *उपमा* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/6.html

🔷 *चक्का* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_48.html

🔷 *लेख-सांडगे* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_18.html

🔷 *पन्हे* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/9.html

🔷 *भाताचे प्रकार* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/11.html

🔷 *लाह्या* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_41.html

🔷 *पाया सूप* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_95.html

🔷 *तक्कु* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_83.html

🔷 *मेतकूट* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_65.html

🔷 *घारगे* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_12.html

🔷 *कैरीचे पन्ह,फालुदा* http://adheepotoba.blogspot.com/2018/05/blog-post_12.html

🔷 *केळ्याचा ब्रेड* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_58.html

🔷 *फोडणीचे पोहे* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/15.html

🔷 *पोह्यांचे प्रकार* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/16.html

🔷 *पफ,सलाड, सांडगे* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_82.html

🔷 *अळूवडीची भाजी* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_5.html

*सर्व समूह सदस्यांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#अन्नपूर्णा*

संकलन:-५

*नमस्कार!*

असे म्हटले जाते की एखाद्याच्या काळजात घर करायचे असेल तर त्याचा मार्ग पोटापासून सुरू होतो. *म्हणूनच मराठीचा ठसा सर्वांच्या काळजावर उमटविण्यासाठी आम्ही अन्नपूर्णा या समूहाची स्थापना केली.*

*मराठी जितकी वापरली जाईल तितका तिचा प्रचार आणि प्रसार होईल या मताला धरून आम्ही महाराष्ट्रभरातील विविध भागातील पाककृती  आणि त्यातील पदार्थांची नावे या समूहातून संकलित करून तुमच्या पुढे सादर करीत आहोत.*

*संकलन:-५*

🔷 *श्रावण घेवड्याच्या बियांची उसळ*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_60.html

🔷 *तीळ खोबरे चटणी*  http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_8.html

🔷 *गवारीचं भरीत* http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_49.html

🔷 *मेथी मला अशी आवडते* 
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_47.html

🔷 *पाईनॅपल कप केक*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_94.html

🔷 *पातोळ्या*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_6.html

🔷 *कढी गोळे* http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_5.html

🔷 *मटर कचोरी*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_77.html

🔷 *बकलावा*
(तुर्कीश स्वीट डिश)
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_35.html

🔷 *गुलाबजाम* http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_76.html

🔷 *मटणाचं लोणचं*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_90.html

🔷 *पनीर स्टफ्फड् आलू टिक्की* http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_26.html

🔷 *कणकेची खीर* http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_81.html

🔷 *सुरनळी*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_85.html

🔷 *मेथीची भाजी*
(पीठ पेरून)
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_34.html

🔷 *गुलपापडी वडी* http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_19.html

🔷 *रायता* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/2.html

🔷 *कोबीचे सूप* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/vasant-kalpande-sir-1.html

🔷 *आंबिल* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/blog-post_28.html

🔷 *भरीत चे प्रकार* http://adheepotoba.blogspot.com/2018/07/3.html

*सर्व समूह सदस्यांचे मनःपूर्वक आभार!!*

*#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान*
*#अन्नपूर्णा*

संकलन:-४

नमस्कार!*

असे म्हटले जाते की एखाद्याच्या काळजात घर करायचे असेल तर त्याचा मार्ग पोटापासून सुरू होतो. *म्हणूनच मराठीचा ठसा सर्वांच्या काळजावर उमटविण्यासाठी आम्ही अन्नपूर्णा या समूहाची स्थापना केली.*

*मराठी जितकी वापरली जाईल तितका तिचा प्रचार आणि प्रसार होईल या मताला धरून आम्ही महाराष्ट्रभरातील विविध भागातील पाककृती  आणि त्यातील पदार्थांची नावे या समूहातून संकलित करून तुमच्या पुढे सादर करीत आहोत.*

*संकलन:-४*

🔷 *पेरूचे पंचामृत,पेरूची भाजी*

http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_78.html

🔷 *भजी (जरा वेगळी च)*

http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_24.html

🔷 *लिंबू भात*

http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_99.html

🔷 *कुकीज,दुधी भोपळयाची भजी/पकोडे*

http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_1.html

🔷 *पालक चीज पॉकेटस्*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_51.html

🔷 *खारी पुरी*

http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_54.html

🔷 *स्टफड् पोटॅटोज्*

http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_97.html

🔷 *क्रॅब केक*
  http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_13.html

🔷 *गाजर केक*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_27.html

🔷 *पालक चीज पॉकेटस्*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_2.html

🔷 *भाकरीचे लाडू*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_75.html

🔷 *मूग दाळ शिरा*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_58.html

🔷 *धपाटे*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_87.html

🔷 *कुरमुरे लाडू*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_42.html

🔷 *कोबी वडे*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_83.html

🔷 *हिरव्या मिरचीचा ठेचा,फोडणीचा झुणका*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_55.html

🔷 *वाटली डाळ*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_92.html

🔷 *अस्पारागस आणि पालकाचे सूप*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_7.html

🔷 दुधाची मसाला आमटी
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_93.html

🔷 *चॉकलेट लाव्हा कुकीज*
http://adheepotoba.blogspot.com/2018/08/blog-post_44.html

सर्व समूह सदस्यांचे मनःपूर्वक आभार!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

आल्मंड कुकीज

आल्मंड कुकीज

साहित्य :

१ वाटी कणीक+मैदा+ओटस् पीठ,अर्धी वाटी बदाम पावडर,पाऊण वाटी बटर, पाऊण वाटी साखर, १ चमचा बेकिंग पावडर,दिड चमचा बेकिंग सोडा,पाव चमचा मीठ,१ चमचा व्हॅनिला इसेन्स, गरजे प्रमाणे दूध, बदाम.

कृती:

* ओव्हन १९०-२००°सें प्रिहीट करावे.
* रूम टेंपरेचरवर बटर आणि साखर व्यवस्थित फेटून घ्यावे.
* सगळी पीठं चाळून घेऊन त्यात बेकींग पावडर,सोडा, मीठ मिक्स करून घ्यावे.
* स्टेप बाय स्टेप बटर साखरेत मिक्स करावे.
* साधारण थालीपीठासारखं मिश्रण तयार होतं.
* ट्रेमधे बेकींग शीट अलाईन करावे आणि स्कूपरने कुकीज ठेवाव्यात बोटाने दाबून बदाम प्रेस करावेत.
* १८०°सें १५-२० मिनिटे साधारणपणे सोनेरी-हलका ब्राउन रंग येईपर्यंत बेक करावे.
* थंड होऊ द्यावे.

चहासोबत मजा लुटा फ्रेश कुकीजची 🍪🍪...

जयश्री खराडे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

कटलेट्स

कटलेट्स

साहित्य:

पोहे १ वाटी,सोया चन्क्स्,कांदा, ढोबळी मिरची, आलं, लसूण ,साखर, गरम मसाले,चाट मसाला,बारीक शेवया,कॉर्न फ्लॉवर

कृती:

१ वाटी पोहे भिजवून ठेवले,सोया चन्क्स तेही उकळत्या पाण्यातून काढून त्यातलं पाणी काढून ठेवले. कांदा,ढोबळी मिरची अगदी बारीक चिरून घेतल.मिक्सरमध्ये पोहे,सोया चन्क्स्,मिरची,आलं,लसूण बारीक करून घेतलं,या मिश्रणात कांदा, ढोबळी मिरची,मीठ,किंचित साखर,गरम मसाला,चाट मसाला हे घालून मळून घेतलं. बारीक शेवया अजून बारीक करून घेतल्या.कटलेट्स चा आकार दिला,शेवयांच्या चुऱ्यात घोळवून तळले.
भाज्यांचे कटलेट करतानाही बटाट्याऐवजी सोया चन्क्स् हा पर्याय आहे. या मिश्रणात वेगळी पिठं टाकावी लागत नाहीत.कटलेट नरम पडू नयेत म्हणून यात १ चमचाभर कॉर्नफ्लोअर घातले की खूप वेळ छान रहातात. तसेच यात डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे टाकले की खायला अजून छान लागतात .

शर्वरी पदे,पुणे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

Tuesday, August 28, 2018

शेपूचे वडे

शेपूचे वडे

साहित्य:
चण्याची डाळ, शेपू आणि कांदा बारीक चिरलेला, लसूण,आले,हिरवी मिरची,जिरे,हळद,हवे असल्यास थोडे तिखट,मीठ

कृती:
*चण्याची डाळ थोडी वेळ भिजत ठेवावी.
*पाणी काढून मिक्सरमध्ये खडबडीत वाटावी. *त्यातच आलं,लसूण,मिरची एक दोनदा फिरवावी.
*त्यात चिरलेला भरपूर शेपू आणि एक कांदा घालून मीठ,हळद जिरे घालून वडे हातावर थापून तळावेत.
* पुदिना चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.

टीप: मी डाळ जास्त वेळ भिजवत नाही. कांदा घातल्यावर पाणी सुटते. डाळ ते पाणी सोक करते. तेल जास्त लागत नाही आणि क्रिस्पी होतात.

रिमा मंकीकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

Monday, August 27, 2018

हिरव्या मिरचीचा ठेचा,फोडणीचा झुणका


🔷फोडणीचा झुणका🔷

साहित्य

दीड वाटी हरभरा डाळ 
४ ते ५ कांदे
६ ते ७ हिरव्या मिरच्या
८ ते ९ लसूण पाकळ्या
१/३ इंच आलं
१ चमचा जिरे
१चमचा मोहरी
१ चमचा हळद पूड
१/२ हिंग पावडर
कडीपत्ता 
कोथिंबीर
१ मोठा चमचा फोडणी साठी तेल
चवीनुसार मीठ

कृती

*प्रथम हरभरा डाळ ८ तास भिजवून घ्यावी.
*भिजलेली डाळ पाणी न वापरता मिक्सर मधून थोडी मोठी मोठी वाटून घ्यावी.
*नंतर वाटलेली डाळ मुटके करून मोदक पात्रात चांगली उकडून घ्यावी.
*उकडलेली डाळ गार झाल्यावर पुन्हा एक एक मुटका मिक्सर मधून फिरवून घ्यावा. डाळ छान बारीक होते.
*मिरच्या, आलं, लसूण, थोडा कडीपत्ता, चिमूटभर जीरे मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
*कांदे बारीक चिरून घ्यावा.

*नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेऊन बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंग होई पर्यंत परतून घ्यावा नंतर त्यात मिरची-आल्या लसणाच वाटण परतून घ्या नंतर जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग, हळद पूड टाकून परतुन घ्यावे.
*हे सगळं झाल्यानंतर आत्ता बारीक करून घेतलेली डाळ, मीठ, कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे.
*थोडा वेळ झाकण ठेवावे आणि झाला फोडणीचा झुणका तयार.

टीप-हा झुणका १ ते २ दिवस चांगला राहतो, प्रवास करताना चपाती सोबत घेऊन जाऊ शकतो.

🔷हिरव्या मिरचीचा ठेचा (खरडा)🔷

साहित्य:
हिरव्या मिरच्या
आलं
सुके खोबरं
कोथिंबीर
तेल

कृती:
*मिरच्या स्वच्छ धुवून घ्याव्या.
*देठ काढून स्वच्छ पुसून घ्याव्या.
*देठ काढलेल्या मिरच्या तव्यावर तेल टाकून छान भाजून घ्याव्या.
*नंतर त्यामध्ये लसूण, सुकं खोबरं, थोडंसं आलं, कोथिंबीर घालून जरासं परतून घ्यावे.
*सगळं एकत्र मिक्सरमध्ये मोठं मीठ घालून बारीक करून घ्या.
*झाला ठेचा तयार!!
माझी आजी, आई मातीच्या छोट्या मडक्याने बारीक करायच्या.

टीप-तव्यावर आपण बत्त्याने सुध्दा बारीक करून घेऊ शकतो.

सौ.वैशाली वेटाळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

कोबी वडे

🔷कोबी वडे🔷

साहित्य:
कोबी, कांदा, तिखट हळद,कोथिंबीर,थोडा ओवा, बेसन, चिमूटभर हिंग,मीठ.

कृती:

१.कोबी आणि कांदा बारीक चिरुन घ्यावा.
२.बेसन सोडून बाकी सगळे एकत्र करून १५ मिनिट ठेवावे. त्या मिश्रणाला पाणी सुटेल. ३.त्यात मावेल एवढे बेसन घालावे.
४.पाणी घालू नये.
५.तव्यावर तेल घालून वडे थापावेत.
६.शॅलो फ्राय करावेत.

रिमा मंकीकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

साटोऱ्या

साहित्य .: 

सारण : बारीक रवा , गुळ , तुप, पाणी वेलची -जायफळ पुड 

पुरी : गव्हाच बारीक पीठ ,मीठ ,तळण्या साठी तेल 

कृती : अगोदर तुप न घालता रवा चांगला भाजुन घ्या त्यात नावापुरते तुप घालुन भाजुन घ्या . बाऊल मध्ये काढुन घ्या दुसर्या बाऊल मध्ये गुळ फोडुन बारीक करुन घ्या आता जितके कप गुळ आहे त्याच्या एक चतुर्थांश पाणी घ्या ते त्या गुळात घालुन गुळाची क्रीम करा गुठळ्या राहता कामा नये वाटल्यास पाणी चमच्याने वाढवा म्हणजे पुरेस होईल मात्र गुळ रवा समप्रमाण किंवा त्याला थोडा कमी घ्या . त्या क्रीम मध्ये हा रवा घालुन २ तास भर भिजुद्या थोडा वेळाने पहा पाणी लागेल का रवा कोरडा पडलाय अस वाटल की थोड पाणी शिंपडा त्याचा लाडु झाला पाहिजे ठिसुळ असा अस मिश्रण ४-५ तास भिजु द्या यात मग वेलची पुड घाला बनवते वेळी 

पुरी : पीठ बारीक चाळण्यासाठी पातेल्याला स्वच्छ सुती कापड बांधुन चाळा . व्यवस्थीत मळुन फर्मेंन्ट होऊ द्या 
पोळपाटावर दोन लाहान पार्या लाटुन त्यात सारण भरा कडेने दुध लावा जेणे करुन कडा कडक नाही होणार थोडा वेळ १५-२० मिनीट सुकवुन मग तळा 

आमच्या कडे नाशिक ,धुळे या भागात लग्ना साठी मुलीकडे एक रात्र जागुन ह्या केल्या जातात जवळजवळ २५ ते ३० किलोच्या ज्या लग्नात तिच्या सासुंचा मान  वाढायला त्याच बरोबर माहेरच्या शिदोरीत देतात त्याला *शेवंती लाटण* म्हणतात. सगळ्या गावातल्या बायका रात्रभर गाणी गात या नव्या सासरवाशीणीला सासर , माहेर म्हणजे काय , तिथली नाती , संस्कारांच पालन हे सगळ सांगत असतात .

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

Saturday, August 25, 2018

उकडीचे गुळसाखर मोदक

🔷उकडीचे गुळसाखर मोदक🔷

मला उपवास हा प्रकार 'मिठाईच्या दुकानात मधुमेही'असा वाटतो .पण कोण करत असेल तर उपवासाचा वनवास न करताही मिटतो ...दोन वेळा मर्यादित जेवणाऱ्या अर्धशतकी वयाच्या व वजनाच्या माणसाला उपवासाने धरावे ? पण हल्ली उपवासाच्या नावाखाली हादडायची फँशन आलीय .देवाच्या नावावर हल्ली काय खपवले जात नाही? 
आज अंगारकी .देवाला मनापासून काहीच न देणे हीच माझी भक्ती कारण त्याच्याकडून काही घेणेही नाही ; पण श्रद्धा व विश्वास अढळ .कुठलेही अवडंबर ,कर्मकांड नाही .पण हिची गणेशभक्ती फारच कडक! या उपवासावरून अनेकदा वाग्युद्धाचे प्रसंग येतात. पण नेहमी मलाच पांढरे निशाण दाखवून शस्त्रसंधी करावी लागते .बहुधा माझ्यासारखे समरप्रसंग नवरे नावाच्या प्राणिमात्रावर नेहमीच गुदरतात म्हणून मला भयभीती वाटण्याचे कारण नाही .
तर मोदक व तेही उकडीचे व मी करावेत असे ठरले कारण कडक उपवासामुळे प्रतिपक्षाची तब्बेत अशक्त झालीय !चला सैन्यातल्या शिस्तीत बदल होईल पण या या देशात यच्चयावत नवरे नाही का म्हणतील?
पण एक अट, 'तू धावते वर्णन करायचे व मी मोदक धावा करायच्या 'याला मान्यता मिळाली व स्वयंपाक क्षेत्ररक्षणास आम्ही तयार झालो  व  कॉमेंट्री सुरू झाली .

साहित्य:

१ नारळ कीस (खोबरे ही चालेल )
किसलेला गूळ
२ कप तांदूळाचे पीठ
वेलचीपूड
मीठ
तांदूळाच्या उकडीत घालण्यासाठी तेल, तूप

कृती:

१) सारण बनवण्यासाठी नारळ खवून घ्या. प्रमाणासाठी एक स्टीलची वाटी घ्या. जितक्या वाट्या कीसलेला नारळ असेल त्याच्या आर्धा किसलेला गूळ व थोडी साखर घ्या. 
पातेल्यात खवलेला नारळ आणि गूळसाखर एकत्र करून मंद आचेवरपरतत राहा. गूळ वितळला की वेलची पूड टाका. थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.
२)पारीसाठी तांदूळाची उकड करण्यासाठी जितके पीठ तितके पाणी असे प्रमाण घ्या. २ कप तांदूळ पिठासाठी २ कप पाणी गरजेचे असते मी हो म्हणत मान डोलवली .
३)जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवत ठेवा. त्यात १ चमचा तेल किंवा तूप घाला. चवीसाठी थोडे मीठ घाला. गॅस बारीक करून पीठ घाला.उलथण्याने ढवळा. गोळगाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या . मध्यम आचेवर २-२ मिनीटे २-३ वेळा वरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊन गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवा. 
४)ताटात तयार उकड काढून घ्या. ही उकड व्यवस्थित मळून घ्या .चांगली एकजीव करा . त्यासाठी कोमट पाणी आणि थोडे तेल घ्या. तेल आणि थोडे पाणी लावून मऊसर मळून घ्या.
५)उकड व्यवस्थित मळून झाली की त्याचे मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्याची पारी तयार करा. त्यात एक चमचाभर सारण भरून बोटाने पारीच्या चुण्या करा. आणि सर्व चुण्या एकत्र आणून मोदक बंद करा.
६)चाळणीवर किंवा शिट्टी न लावता मोदक उकडायला ठेवा . वरून झाकण लावून १०-१२ मिनीटे वाफ काढा.

आता झाले तुमचे काम ते थंड होऊ द्या .चंद्रोदय व्हायला अवकाश आहे .मी मध्येच म्हटले," एक खाऊन बघू का ?","खा ना ,पण त्या अगोदर विशाल गणपतीच्या दर्शनाला चला. आज खूप गर्दी असणार आहे. निदान दहा तरी वाजतील परत यायला. मग मीच देईन! 'गुळसाखरेचा मोदक' माझ्या गणपतीला"

काकासाहेब वाळुंजकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

सुरळीच्या वड्या

खूप दिवसांची इच्छा होती सुरळीच्या वड्या करून बघायची. मागे सुट्टीत मावशीकडे गेले होते तेव्हा खास शिकण्यासाठी करून दाखवायला सांगितले होते. शिकलेला पाठ- आठवणीत ठेवून प्रयोग करण्याचा योग ४ वर्षांनी आला. जमेल का.... जमेल का अशा विचार करत वड्या करायला घेतल्या. शेवटी एकदाच्या सुरळीच्या वड्या सुरळीत पार पडल्या😃.खूपच देखण्या झाल्या.तरी शेवटी नजर लागू नये म्हणून किंचितसे मीठ जास्त झालेच😅.

                सुरळीच्या वड्या

साहित्य:

१ वाटी दही
१ वाटी बेसन
१/४ चमचा हिंग
१/२ चमचा हळद
मीठ
तेल
नारळाचा किस
फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता,हिरव्या मिरच्या

कृती:

*१ वाटी दही घेऊन त्यात १ वाटी पाणी घ्यावे व चांगले घुसळावे.
*त्यात १वाटी बेसन घेऊन छान एकही गुठळी राहू नये असे घुसळावे.
*त्यामधे १/४ च. हिंग, १/२ च हळद व बेताने मीठ घालावे. (माझे दही खूप गोड असल्याने वड्या थोड्याशा खारट झाल्या असाव्यात.)
* हे सगळे मिश्रण एकत्र करून कमी आचेवर सतत ढवळावे. नाहीतर भांड्याला चिकटण्याची शक्यता असते.
*मिश्रण तयार होत आले कि हात थोडे जडपणे हलतात.
*छोट्या चमच्याने थोडे मिश्रण कट्ट्यावर पट्टीच्या आकारात पसरावे. एका बाजूने टाकावे अलग उचलून सुरळी होती का पहावे. असे ३-४ वेळेस करून पहावे. सुरळी होते असे वाटल्यास आच बंद करावी.
स्वच्छ ओट्यावर तेल लावून मिश्रण पटकन ओतून चमच्याच्या उलट्या बाजूने पातळसर पसरवावा.
*त्यावर नारळाचा किस व कोथिंबीर पसरवावी.
*थंड झाल्यावर याच्या साधारण २इंचाच्या उभ्या पट्ट्या कापा व एकीकडून अलगद उचलून प्रत्येक पट्टीची सुरळी करावी.
*या सर्व सुरळ्या एका प्लेटमध्ये ठेवाव्यात.
*त्यावर मोहरी, जिरे ,हिंग हळद कढीपत्ता, हिरव्या मिरच्या यांची खमंग फोडणी ओतावी.

अस्मिता भस्मे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

राजगिरा खीर

🔷राजगिरा खीर🔷

साहित्य-

१वाटी राजगिरा, साखर, दूध, सुका मेवा, वेलची पूड, पाणी. 

कृती

राजगिरा धुऊन १ वाटी पाणी टाकून कुकर मध्ये ३ शिटी करून शिजवून घ्या. दूध उकळत ठेवा, उकळी आली की शिजवलेला राजगिरा टाका, आणि एकत्र करा मग साखर वेलची पूड , सुका मेवा घाला आणि १ उकळी काढा. 
थंड /गरम कशीही खा...

अंजली अतुल जोशी

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

कोहळयाची अवकाडो- कोशिंबीर

🔷कोहळयाची कोशिंबीर🔷

साहित्य
१ कोवळा कोहळा
२ चमचे शेंगदाणे कूट (आवडत असेल तर जास्त घेऊ शकता )
२ चमचे ताजे दही 
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
चिमूटभर जिरे
चिमूटभर मोहरी
२ चमचे फोडणी साठी तेल

कृती

प्रथम कोहळा किसून घ्यावा, किसलेले कोहळा थोडे पाणी घालून स्वच्छ धुवून करकरीत पिळून घ्यावा,
नंतर एका भांड्यात कोहळा मोकळा करून घ्यावा, त्यामध्ये शेंगदाणे कूट, दही, मीठ, कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्यावे,
नंतर त्यामध्ये मिरची, जिरे,मोहरी ची फोडणी करून घ्यालावी व चांगले मिक्स करून घ्यावे.

खावयास तयार कोहळा कोशिंबीर!!

टीप
कोहळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण जे कोहळा करकरीत पिळून पाणी काढतो ते पाणी न फेकता भाकरी करण्यासाठी वापरावे.

सौ. वैशाली वेटाळे.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

अवकाडोची कोशिंबीर (ग्वाकामोले उर्फ ग्वाक)

हा मुळचा मेक्सिकन पदार्थ अमेरिकन जनतेने आपलासा केलाय. आपल्याकडील मसालेभात आणि पुलावाचा सख्खा भाऊ शोभेल अशा ‘बरीटो’भाताबरोबर ही हवीच हवी. पण तसेही थंडीच्या मोसमात ही कोशिंबीर पौष्टिक म्हणून अवश्य खावी असे इकडचे आहारतज्ञ सांगतात.
आधी हे रायते मी इकडच्या हॉटेलमध्ये चाखले. आवडले म्हणून घरी करुन पाहिले. तुम्हाला अवकाडो फळे मिळाली तर जरूर करुन पहा. आपल्याकडच्या कवठाच्या गरासारखीच पण थोडी निराळी चव ह्या फळाच्या गराला असते.

साहित्य:

२ पिकलेली अवकाडो फळे, १ छोटा कांदा, १ लालबुंद टोमॅटो, वाटीभर कोथिंबीर, दोन मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, २ लसूण पाकळ्यांचा ठेचा (ऐच्छिक), मीठ (चवीनुसार)

कृती:

कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरच्या हे सर्व बारीक चिरून घ्यावे.
अवकाडो फळाचे दोन तुकडे करावेत. आतली बी काढून टाकावी आणि चमच्याने फळातला सगळा मऊ हिरवागार गर खरवडून एका वाडग्यात काढून घ्यावा. त्यावर लगेच लिंबाचा रस ओतावा म्हणजे गराचा रंग बदलणार नाही. आता सगळा गर आणि मिरच्या, कोथिंबीर (पाट्यावर/ रगड्यावर किंवा मिक्सरवर ) एकत्र करुन चटणी प्रमाणे दाट वाटून घ्यावे. वाटलेल्या मिश्रणात कांदा, टोमॅटो, लसूण ठेचा आणि शेवटी मीठ घालून कालवून घ्यावे की झाली कोशिंबीर तयार.

© सौ. प्रीति कामत-तेलंग

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

खान्देशी खिचडी

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनेक खाद्य प्रकारांचा वारसा लाभलेला आहे .मग त्यात कोकण, घाटी, विदर्भ, मध्य , उत्तर , दक्षिण असे अनेक नानापरी तोडीस तोड देणारे पदार्थ केले जातात .त्यात पारंपारिक पद्धती वापरुन केलेले पदार्थ आजही सातासमुद्रापार लोकप्रिय झालेले आज पहायला मिळत . असाच एक भाग खान्देश .नाव वाचल्याबरोबर आठवतो त्यातला काळा झणझणीत मसाला आणि त्यापासून बनवलेले पदार्थ .मग त्यात रशी- पातोडे , खान्देशी भरीत ,दाल-बट्टी, डुबुक-वड्या , वडारस्सा , मिसळ , गोळाभात अशी कितीतरी नाव घेता येतील .अगदी वशाटाच्या तोडीस तोड देणारी ही जेवण पद्धती . आज त्यातलाच एक प्रकार म्हणजे खान्देशी खिचडी मी केलीय . बघा कधी जमली तर नक्की करुन पहा 

खान्देशी खिचडी

साहित्य

२ वाटी तांदूळ (आम्ही इंद्रायणी घेतला ,तसा कोणताही चालतो )
१ वाटी डाळी (मूग , हरभरा ,तूर , मसूर, मटकी मिक्स )
कांदा १ 
टोमॅटो १ 
बटाटा १ 
इतर काही भाज्या आवडीनुसार मी वांगे , फरसबी , फ्लॉवर , वटाणा घेतला , शिमला मिरची  पण चालते .
लसुन १०-१२ कळ्या ,
१" आल 
कढीपत्ता १-२ काड्या , 
फोडणीसाठी जीरे ,मोहरी 
अर्धी वाटी तेल 

मसाले : लाल तिखट ,हळद , खान्देशी मसाला 
स्पेशल वाळवलेला उभा चिरलेला कांदा 
कोथींबीर 
खोबऱ्याचे पातळ काप 
काजू शेंगदाणे (दोन्ही भिजवा २० मिनी, ऐच्छिक आहे )

कृती:

१). सर्वप्रथम कुकरमध्ये तेल सढळ हाताने घाला व ते गरम करुन त्यात जिरे ,मोहरी,कढीपत्ता घालून तडकवा . 
२)आता त्यात लसूण व आलं घालून थोडावेळ परतवा .
२ .आता कापलेला कांदा पारदर्शक होईस्तोवर परतवा त्यात शेंगदाणे व खोबऱ्याचे काप /काजू , मग एकएक भाजी घाला . 
३. मग गॅस मंद करुन त्यात सारे मसाले एक एक करुन घाला .बुडाला लागणार नाहीत याची काळजी घ्या .
४.त्यात मीठ व स्वच्छ धुतलेले तांदूळ - डाळ घालून चागंले परतवा. तांदूळ सर्व बाजूने तेलात परतले गेले पाहिजे. आता त्यात पुरेसे पाणी घालून एक उकळी येऊ द्या . मगच झाकण लावून ३ शिट्या होऊ द्या .कुकर थंड झाला की मस्तपैकी ताट सजवा. त्यासाठी वाळवलेला कांदा थेंबभर तेल तव्यावर घालून भाजा आणि तो वापरा .वर कोथंबीर फिरवा. फोटो काढून समूहावर पोस्ट करा .🙏🏻

कु.सागर महाजन

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा