Saturday, August 25, 2018

भाकरीचे लाडू

🔷भाकरीचे लाडू🔷

साहित्य:

१.आदल्या दिवशीची भाकरी, (नाचणी+ज्वारी+मका पीठ)
गूळ,
२.साजूक तूप,
३.दाण्याचा कूट,
४.वेलची पावडर.

कृती:

*भाकरी मायक्रोव्हेव्हमध्ये २० सेकंद गरम केली .
*लगेच तुकडे करून मिक्सर मध्ये घालून त्यात गूळ, तूप घालून बारीक होइपर्यंत फिरवले .
* दाण्याचा कूट आणि वेलची पावडर घातली व एकदा फिरवले आणि लाडू वळले.

**गरम असल्यामुळे गूळ, तूप व्यवस्थित मिसळून येते आणि मिक्सरला चिटकत नाही.

रिमा मंकीकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment