खारी पुरी
साहित्य :
२कप मैदा, २चमचे बेसन पीठ, १चमचा जिरे,६-७ काळया मिऱ्या ,ओवा, तूप ,मीठ आणि पाणी
कृती:
१.जिरे आणि मिरी /ओवा जाडसर कुटून घ्यावे २.मैदा आणि बेसन ,मीठ कुटलेले जिरे नि मिरी व तूप एकत्र करून घेऊन पाणी टाकून भिजवून घ्यावे.
३.चांगलं मळून घ्यावे आणि थोडा वेळ झाकून ठेवावे.
४.मग पुरी लाटून सुरीने टोचून घ्या म्हणजे पुरी फुलत नाही.
५.पुऱ्या तळून घ्याव्यात.
या पुऱ्या २०-२५ दिवस टिकतात.मात्र हवा बंद डब्यात ठेवाव्यात म्हणजे सादळत नाहीत.
अंजली अतुल जोशी
धन्यवाद!
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment