Friday, August 17, 2018

कटलेट

मक्याचे कटलेट

उकडलेले मक्याचे दाणे,उकडलेले बटाटे,किसलेले चीज,अालं, लसूण ,मिरची कोथिंबीर पेस्ट नि धणे जीरा पावडर ,लाल तिखट ,थोडा मैदा व २ चमचे तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून रवा लावून पॅन वर फ्राय करावे.

समता कोळवणकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

पोहा कटलेट

सकाळी नाशत्याला केलेले पोहे , थोडे जास्त झाले मग परत तेच संध्याकाळी खायचं कंटाळा आला होता. मग काय ...केला थोडा उपद्व्याप!

उरलेले पोहे , त्यात लाडका बटाटा , उकडलेले हिरवे मटार आणि गाजर , कुठल्याही पदार्थाला स्वादिष्ट बनवणारे थोडी आले मिरची पेस्ट , चाट मसाला आणि कोथिंबीर घालून एकत्र मळले . टोस्ट चा चुरा किंवा तांदूळ पीठ  व रवा यात घोळवून शॅलो फ्राय केले.झाले कटलेट तयार!!

अमृता शेट्ये

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment