🔷पेरुची भाजी🔷
साहित्य:
हिरवे पण गाभुळे पेरू ,जास्त पिकलेले नको .
स्वच्छ धुऊन घेतलेले .
खोबरे (ओला नारळ असल्यास उत्तम )
आले ,
लसूण ,
लाल तिखट,
गरम मसाला ,
मीठ,
गूळ,
हळद,
फोडणी साहित्य.
कृती:
*खोबरे ,लसूण ,आले मिक्सर मधे बारीक करून घ्या .
*गॅसवर भांडे ठेवून त्यात पुरेसे तेल टाका .
*फोडणी द्या ,हळद, हिंग ही वापरा
*गॅस मंद करूं आले लसूण खोबरे तेलात परतून घ्या .
*आता पेरूच्या बिया काढलेल्या फोडी भांड्यात टाका .
*गरजेप्रमाणे लाल तिखट मीठ गरम मसाला टाका .
*वरचेवर परतून घ्या .
झाकण ठेऊन वाफवा .
*तेल बाजूला आले की ,चवीसाठी गूळ व *चिंचेचे बोटूक टाका.
*शिजण्यासाठी अंगापुरता रस्सा राहील एवढे पाणी टाका.
*मंद गॅसवर शिजू द्या .
*भाजी शिजली की मस्त आवडीने खा .
काकासाहेब वाळुंजकर
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
🔷पेरूचे पंचामृत🔷
साहित्य
४पेरू,
अर्धी वाटी दाणे कूट,
अर्धा वाटी तिळकूट,भाजून केलेली,
८-१०हिरवी मिरची चे तुकडे
मीठ,
अर्धा टी स्पून मेथीची पूड, (मेथी तळून घेणे.)
हिंग आणि फोडणीचे सामान,
२वाटी गरम पाणी .
कृती:
१.पेरू धुवून पुसून घ्या.
२.बिया काढून फोडी करून पाण्यात टाका. ३.फोडणी करा मिरची तुकडे मेथी पूड पेरू फोडी घाला.
४.२वाफा आणा.मग २वाटी गरम पाणी घाला. ५.मीठ, गूळ, तिळकूट, दाणे कूट घाला आणि वाफ काढा.
हे पंचामृत खूप छान लागते, मुलांना पण आवडते.
अंजली अतुल जोशी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment