Saturday, August 25, 2018

श्रावण घेवड्याच्या बियांची उसळ

🔷श्रावण घेवड्याच्या बियांची उसळ🔷

साहित्य:
श्रावण घेवड्याच्या बिया ,
फोडणीचे साहित्य,
टोमॅटो,
कोल्हापुरी कांदा लसूण चटणी,
मीठ चवीनुसार.

कृती:

१.श्रावण घेवड्याच्या बिया बोटांनी दाबता येतील इतपत शिजवाव्यात. २.दाणे जास्त शिजलेे तर कुठल्याही उसळीची मजाच निघून जाते... तेव्हा हे महत्त्वाचे.
३.फोडणी साठी तेलात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता टाकावा.
४. नंतर कांदा टाकून लालसर परतल्यानंतर त्यामधे टोमॉटोच्या फोडी टाकाव्यात.
५. एकजीव झाल्यानंतर त्यात शिजवलेल्या श्रावण घेवड्याच्या बिया टाकाव्यात.
६.नंतर कोल्हापूरी कांदा लसूण चटणी व मीठ टाकून चांगले मिक्स करून वरून कोथिंबीर भुरभुरावी.
७.अगदी कमी साहित्यात होणारी झटपट चविष्ट उसळ तयार😋😋.

डॉ. अस्मिता भस्मे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment