🔷वाटली डाळ🔷
साहित्य:
१ वाटी चणाडाळ
फोडणीसाठी: ४ टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहरी, १/२ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून
हळद, ४-५ कढीपत्त्याची पाने
३-४ हिरव्या मिरच्या
चवीपुरते मीठ
१/२ टिस्पून साखर
१/२ वाटी ओले खोबरे
लिंबाचा रस
कोथिंबीर
कृती:
१) चणा डाळ पाण्यात ३-४ तास भिजवावी. ही चणाडाळ पाणी न घालता भरडसर वाटून घ्यावी.
२) कढईत तेल गरम करावे. हिंग, हळद, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करावी. वाटलेली चणाडाळ फोडणीस घालावी. चणाडाळ मध्यम आचेवर परतत राहावी. चवीनुसार मीठ, साखर घालावे.
३) चणाडाळीला ३-४ वेळा वाफ काढावी. वाफ काढताना चणाडाळीला पाण्याचा हबका मारावा.
४) चणाडाळ नीट शिजली कि थोडे ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी.
५)वाढताना लिंबाचा रस घालून ढवळावे.
अंजली अतुल जोशी.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment