Saturday, August 25, 2018

अळूची भाजी

अळूची भाजी

तयारी:
अळू बारीक चिरुन, आंबट चुका बारीक चिरुन, शेंगदाणे उकडून, खोबरे काप, मुळा काप, हिरवी मिरची, कढीपत्ता.

कृती:

१.कढईत तेल घ्यावे, तापल्यावर मोहरी तडतडावी, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढिपत्ता घालून परतावे.
२. त्यावर बारीक चिरलेला अळू घालून परतावे, मंद आंचेवर दणदणीत वाफ आणावी.
३.अळू चांगला शिजल्यावर चमच्याने चांगला मोडून घ्यावा.आता त्यात आंबट चुका, शेंगदाणे, खोबरे, मुळा घालून एक वाफ घ्यावी. चमच्याने भाजी मोडून एकजीव करुन मीठ, गूळ, चिंचेचा कोळ घालून एकजीव करावे. ४.चमचाभर बेसन पाण्यात मिसळून मिसळावे; आणि भाजीला कढ आल्यावर बंद करावे. ५.पोळी किंवा भाकरीबरोबर आस्वाद घ्यावा.

सौ.दीपाली प्रसाद

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment