🔷पनीर स्टफ्फड् आलू टिक्की🔷
साहित्य :
स्टफिंगसाठी- पनीर,पांढरी मिरी पावडर,आल-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, रस,चवीपुरती साखर,मीठ.
टिक्की कव्हर - उकडून किसून घेतलेले बटाटे,ब्रेड क्रम्ब्स्,चिली फ्लेक्स(अजून थोडी पावडर करून घ्यावी),धणे पावडर,जिरे पावडर, किंचित हळद, कोथिंबीर,मीठ.
कृती:
* पनीर हातानेच चांगलं क्रश करून घ्यावे.
* कढईत एक चमचा तेल गरम झालं की पटापट आलं-लसूण पेस्ट,कांदा घालावा, शक्यतो मंद आच ठेवावी ज्यायोगे रंग पांढराच राहील. पनीर घालावे,पांढरी मिरे पूड,मीठ, लिंबू रस टाकून मिश्रण थोडे कोरडे झाले की आच बंद करावी.
* बटाट्यांमध्ये थोडे ब्रेड क्रम्ब्स् घालावेत, हळद, चिली फ्लेक्स,धणे जिरे पूड,मीठ घालून छान मळून घ्यावे.
* याचा एक गोळा घेऊन हातावरच गोल थापून पनीर स्टफींग भरुन टिक्की ब्रेड क्रम्ब्स् मधे घोळवून घ्यावी.
* तयार टिक्की १/२ तासासाठी फ्रिज मध्ये ठेवाव्यात.
* बाहेर काढून हव तस डीप फ्राय/शॅलो फ्राय करू शकता.
गरम कॉफी.. चहा... या सगळ्यांनाच वेलकम करतात..
जयश्री खराडे.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment