Saturday, August 25, 2018

मूग दाळ शिरा

मूग दाळ शिरा

साहित्य
१ वाटी मूग डाळ,
पाऊण वाटी साजूक तूप,
पाऊण वाटी साखर,
वेलचीपूड,
जायफळ पूड,
हवे ते सुके मेवे(मनुके नकोत शक्यतो),
चिमूटभर मीठ.

कृती :
* ३-४ तासांसाठी मूग डाळ भरपूर पाण्यात भिजत ठेवावी.
* पाणी निथळून घेऊन मिक्सरवर डाळ सरबरीत (coarsed) वाटून घ्यावी.
*पॅनमध्ये तूप गरम झाले की डाळ तुपात छान परतत रहावी.
* दुसरीकडे पाक तयार करताना पाऊण कप साखरेत अर्धा कप पाणी घालावे.साखर विरघळल्यावर १०-१५ मिनिटे पाक चांगला उकळू द्यावा.घट्ट होऊ लागतो.
* डाळीला छान सोनेरी आणि मग हळूहळू ब्राऊन रंग चढायला सुरुवात होते, पाक हळूहळू मिक्स करावा, चिमूटभर मीठ घालावे, मिश्रण सतत हलवत रहावे.
* तूप सुटेपर्यंत परतल्यावर वेलची-जायफळ पावडर घालून छान मिक्स करावे.
* गॅसवरुन खाली उतरवल्यावर हव्या त्या भरपूर मेव्यानी सजवून गरम गरम खायला घ्यावे.

जयश्री खराडे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment