Saturday, August 25, 2018

पेढे

🔷पेढे🔷

बदाम,दूध, साखर प्रत्येकी १वाटी,
१चमचा तूप

कृती:
*रात्री बदाम भिजत घालून सकाळी साले काढून मिक्सर ला बारीक करावे .
*एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर, बदाम पेष्ट,दुध व तुप एकत्र करुन मध्यम आचेवर ठेवावे ,
चमच्याने हलवत रहावे .
१चमचा वेलची पुड मिसळावी मिश्रण कडेने सुटू लागले की गोळा बनतो ,मग खाली उतरवून थोडे गार होऊ द्यावे ,
हाताला सोसेल इतपत गार झाले की पेढे वळावेत ,त्यावर १ काडी केशर ड्राय फ्रुट चा चुरा घालून सजवावे आणि.......हळूच १ गट्टम करावा ☺
नुकताच चातुर्मास चालू झालाय ,आता श्रावण येईल मग गोडधोड पदार्थांची रेलचेल चालू होईल मग पेढे करा हं नक्की खूप स्वादिष्ट झालेत .

डॉ. संध्या झाडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment