Saturday, August 25, 2018

चॉकलेट लाव्हा कुकीज

🔷चॉकलेट लाव्हा कुकीज🔷

साहित्य-
मैदा २००ग्राम,
मस्का(बटर) ५० ग्राम,
डार्क चॉकलेट,
पिठी साखर(साखर बारीक करून घेतली तरी चालते) कोको पावडर,
हवं असल्यास व्हॅनिला इसेन्स,
बेकिंग पावडर आणि सोडा

कृती-
१.प्रथम ओव्हन २००℃ वर १५ मिनिटं प्रीहिट करण्यास ठेवला.
२.नंतर मस्का विरघळवून थंड होता त्यात साखर एकत्रित केली(मस्का अन साखर मिश्रण पूर्ण सफेद दिसेपर्यंत फेटले)
३.त्यात इसेन्स ५ ते ६ थेंब एकत्रित केले, त्यात मैदा-१ मोठा चमचा, कोको पावडर- १ छोटा चमचा ,बेकिंग पावडर-१/४ चमचा बेकिंग सोडा एकत्र करून चाळून हळू हळू एकजीव केले.
४.नंतर हातानेच हलके मळून घेतले.५.दुसरीकडे चॉकलेट चे छोटे तुकडे करून ठेवणे(हे विरघळून थोडे थंड करून घेतले तरी चालतात, फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवले)
६.तयार मिश्रणाचे हवे त्या सम आकाराचे गोळे करून डार्क चॉकलेट सारण भरतो त्या पद्धतीत भरून गोळे करून हलकेच दाबून बेकिंग प्लेट वर ठेवले.(बेकिंग प्लेट ला हलके बटर लावावे.)
७.नंतर प्री हिट ओव्हन मध्ये १८०℃ ला २५ मिनिटं ठेवले.
८.तयार कुकी थंड होऊ दिले.
स्वादिष्ट चॉकलेट लाव्हा कूकीज खायला तयार!!

रोशनी

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment