Saturday, August 25, 2018

धपाटे

🔷धपाटे🔷

साहित्य:

२ वाटी तांदूळ पीठ,
१ वाटी गव्हाचे पीठ,
१ वाटी हरभरा डाळीचं पीठ,
पाव वाटी उडीद डाळ पीठ,
हिंग-जिरे-धने पूड १ चमचा,
हळद पूड १ चमचा.

कृती:

१.५-६ हिरव्या मिरच्या, ७-८ लसुण पाकळ्या, आलं अर्धा इंच, कोथिंबीर एकत्र करून मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.
२.सगळी पिठं,पेस्ट, हळद पूड, धने-जिरे-हिंग पूड एकत्र करून चांगले मळून घ्यावे आणि धपाटे लाटावे.
३.एखादा छोटा रुमाल घेऊन त्यावर पाण्याचा हात लावून पीठ थोडे पसरून घ्यावे नंतर हळूहळू लाटण्याने पसरून घ्यावा.
४.रुमाल तसाच अलगद उचलून गरम तव्यावर घालावा (म्हणजे धपाटा तव्यावर व रुमाल वरती) व त्याच्यावर पाणी टाकून (म्हणजे आपण भाकरीला पाणी पसरवतो तसं) बोटाचे शिक्के उठवावे.
५.नंतर रुमाल अलगद काढावा. व बाजूने तेल सोडून झाकण ठेवून धपाटा फक्त एकाच बाजूने भाजावा.
६.तव्यातून ताटात आला की खावयास तयार धपाटा... 

सौ. वैशाली वेटाळे.

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment