🔷मटर कचोरी🔷
(मटारच्या सिझनमधली झालीच आणि केलीच पाहिजे अशी डिश...
लहान थोर सर्वांच्या आवडीची,तसे पारंपरिक मटार कंरजीला थोडासा छेद देवून, आणि घटकपदार्थांमधील फेरबदलाने मस्त पर्याय तयार होतात... !!)
साहित्य :
सध्या हिरवे वाटाणे,
लसूण,मिरची,आलं,खोबर,कोथींबीर ह्यांचं वाटण,
धण्याची भरड,जिरे पूड, मोहरी,हिंग, लिंबू रस,साखर,मीठ.
कचोरीची पारी : मैदा,१/४ मैद्याच्या एक चतुर्थांश रवा,तेलाचे मोहन,मीठ,साखर
कृती:
* मैदा,रवा,मीठ,साखर एकत्र करून गरम तेलाचे मोहन घालावे. मिश्रणाला तेल व्यवस्थित चोळून घ्यावे,हाताने हलकं दाबले तर गुठळी व्हावी इतपत तेल असावे. पाणी टाकून जरासा घट्टच उंडा मळून घ्यावा.
* कढईत तेल तापले कि मोहरी, हिंग,धण्याची भरड आणि नंतर वाटण घालावे, छान परतून घ्यावे.
* ग्रीन पीज (ओले मटार )मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यावेत. कढईत एकत्र करून एक वाफ काढावी.
* जिरे पावडर, लिंबू रस घालावा.
* मिश्रण थंड होण्यासाठी पसरून ठेवावे.
* मळलेल्या उंड्याचे लिंबाएवढे गोळे बनवून घ्यावेत.
* चांगले मळून घेऊन,मटारचे मिश्रण भरून घ्यावे,कचोरी सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्यावी. किंचीत लाटून घ्यावी.
* कढईत तेल मध्यम गरम झाले की कचोऱ्या तळून घ्याव्यात.
* टोमॅटो केचप, तळलेली खमंग मिरची याचीही गरज नाही... तुमची इच्छा...
मला फक्त वाफाळता चहा हवा...
जयश्री खराडे.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment