खूप दिवसांची इच्छा होती सुरळीच्या वड्या करून बघायची. मागे सुट्टीत मावशीकडे गेले होते तेव्हा खास शिकण्यासाठी करून दाखवायला सांगितले होते. शिकलेला पाठ- आठवणीत ठेवून प्रयोग करण्याचा योग ४ वर्षांनी आला. जमेल का.... जमेल का अशा विचार करत वड्या करायला घेतल्या. शेवटी एकदाच्या सुरळीच्या वड्या सुरळीत पार पडल्या😃.खूपच देखण्या झाल्या.तरी शेवटी नजर लागू नये म्हणून किंचितसे मीठ जास्त झालेच😅.
सुरळीच्या वड्या
साहित्य:
१ वाटी दही
१ वाटी बेसन
१/४ चमचा हिंग
१/२ चमचा हळद
मीठ
तेल
नारळाचा किस
फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता,हिरव्या मिरच्या
कृती:
*१ वाटी दही घेऊन त्यात १ वाटी पाणी घ्यावे व चांगले घुसळावे.
*त्यात १वाटी बेसन घेऊन छान एकही गुठळी राहू नये असे घुसळावे.
*त्यामधे १/४ च. हिंग, १/२ च हळद व बेताने मीठ घालावे. (माझे दही खूप गोड असल्याने वड्या थोड्याशा खारट झाल्या असाव्यात.)
* हे सगळे मिश्रण एकत्र करून कमी आचेवर सतत ढवळावे. नाहीतर भांड्याला चिकटण्याची शक्यता असते.
*मिश्रण तयार होत आले कि हात थोडे जडपणे हलतात.
*छोट्या चमच्याने थोडे मिश्रण कट्ट्यावर पट्टीच्या आकारात पसरावे. एका बाजूने टाकावे अलग उचलून सुरळी होती का पहावे. असे ३-४ वेळेस करून पहावे. सुरळी होते असे वाटल्यास आच बंद करावी.
स्वच्छ ओट्यावर तेल लावून मिश्रण पटकन ओतून चमच्याच्या उलट्या बाजूने पातळसर पसरवावा.
*त्यावर नारळाचा किस व कोथिंबीर पसरवावी.
*थंड झाल्यावर याच्या साधारण २इंचाच्या उभ्या पट्ट्या कापा व एकीकडून अलगद उचलून प्रत्येक पट्टीची सुरळी करावी.
*या सर्व सुरळ्या एका प्लेटमध्ये ठेवाव्यात.
*त्यावर मोहरी, जिरे ,हिंग हळद कढीपत्ता, हिरव्या मिरच्या यांची खमंग फोडणी ओतावी.
अस्मिता भस्मे.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment