Saturday, August 25, 2018

पालक चीज पॉकेटस्

पालक चीज पॉकेटस्

साहित्य

बारीक चिरलेला पालक,२ बटाटे उकडून स्मॅश केलेले, किसलेले चीज, बारीक चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण,हिरवी मिरची, मिरेपूड, ओरिगानो,बटर,पेस्ट्री शीटस्,मीठ.

कृती:

* ओव्हन २००°सें १०-१२ मिनिटे प्रिहीट करून घ्यावा.
* पॅनमध्ये बटर वितळवून आधी लसूण मग मिरची छान फ्राय करून घ्यावेत.
* कांदा टाकून २ मिनिटे परतून घ्यावा.
* बारीक चिरलेला पालक २ मिनिटे सॉटे करून घ्यावा.
* बटाटा मिक्स करून हे मिश्रण सतत हलवत रहावे.
* ओरीगानो, चीझ मिक्स करून गॅस बंद करावा.
* हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे.
*पेस्ट्री शीटस् हव्या त्या आकारात कापून घ्याव्यात, पालकचे मिश्रण स्टफ करून कडा व्यवस्थित दाबून घ्याव्यात.
*बेकींग ट्रेमधे ठेवून १२-१५ मिनिटे बेक करून घ्यावेत.
* पॉकेटस् तय्यार...

आवडत्या सॉस, गरम चहासोबत पावसाची मजा लुटा.

जयश्री खराडे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment