साहित्य .:
सारण : बारीक रवा , गुळ , तुप, पाणी वेलची -जायफळ पुड
पुरी : गव्हाच बारीक पीठ ,मीठ ,तळण्या साठी तेल
कृती : अगोदर तुप न घालता रवा चांगला भाजुन घ्या त्यात नावापुरते तुप घालुन भाजुन घ्या . बाऊल मध्ये काढुन घ्या दुसर्या बाऊल मध्ये गुळ फोडुन बारीक करुन घ्या आता जितके कप गुळ आहे त्याच्या एक चतुर्थांश पाणी घ्या ते त्या गुळात घालुन गुळाची क्रीम करा गुठळ्या राहता कामा नये वाटल्यास पाणी चमच्याने वाढवा म्हणजे पुरेस होईल मात्र गुळ रवा समप्रमाण किंवा त्याला थोडा कमी घ्या . त्या क्रीम मध्ये हा रवा घालुन २ तास भर भिजुद्या थोडा वेळाने पहा पाणी लागेल का रवा कोरडा पडलाय अस वाटल की थोड पाणी शिंपडा त्याचा लाडु झाला पाहिजे ठिसुळ असा अस मिश्रण ४-५ तास भिजु द्या यात मग वेलची पुड घाला बनवते वेळी
पुरी : पीठ बारीक चाळण्यासाठी पातेल्याला स्वच्छ सुती कापड बांधुन चाळा . व्यवस्थीत मळुन फर्मेंन्ट होऊ द्या
पोळपाटावर दोन लाहान पार्या लाटुन त्यात सारण भरा कडेने दुध लावा जेणे करुन कडा कडक नाही होणार थोडा वेळ १५-२० मिनीट सुकवुन मग तळा
आमच्या कडे नाशिक ,धुळे या भागात लग्ना साठी मुलीकडे एक रात्र जागुन ह्या केल्या जातात जवळजवळ २५ ते ३० किलोच्या ज्या लग्नात तिच्या सासुंचा मान वाढायला त्याच बरोबर माहेरच्या शिदोरीत देतात त्याला *शेवंती लाटण* म्हणतात. सगळ्या गावातल्या बायका रात्रभर गाणी गात या नव्या सासरवाशीणीला सासर , माहेर म्हणजे काय , तिथली नाती , संस्कारांच पालन हे सगळ सांगत असतात .
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment