Saturday, August 25, 2018

क्रॅब केक  

क्रॅब केक
 
१५ -२० मिनिटांपूर्वी सचिनने(अहो) हा फोटो शेअर केला..
ऑफिसजवळच्या लोकल क्लबमधे काढला होता. क्रॅब केक अस नाव होत डिशचं !!
तो अजिबातच मासे न खाणारा, पण यांची चव जाम आवडली न् मी क्रॅबमीट घेऊन येतो तू तुझा ट्विस्ट देऊन (कारण तिखट-मीठ इकडे नावापुरतंच) हे बनवशील हे ही अॅडीशन...!!
मी जाम खूश... शाकाहारी असले तरी हे सगळं हातात घ्यायची,त्या डिश बनवायची खूप इच्छा होती... 
अख्खा खेकडा नाही...मीट तरी..
या आनंदात शोधाशोध करून रेसिपी तयार केली.. किती बरोबर ठाऊक नाही..😀

साहित्य:

क्रॅबमीट,२ अंडी,मेयॉनीज,ब्रेड क्रम्ब्स,काळी मिरेपूड,चिली फ्लेक्स, बारीक चिरलेला कांदा, भरपूर लसूण,एक हिरवी मिरची बारीक चिरून, कांद्याची पात, लिंबू रस, कोथिंबीर,मीठ,तेल, बटर.

कृती : 

*अंडी फेटून घेऊन त्यात मेयॉनीज घालून परत मिक्स करावे.
* कांदा, कांद्याची पात,मिरची,चिली फ्लेक्स,मिरे पूड, कोथिंबीर,लिंबू रस,मीठ घालावे.
* क्रॅबमीट घालावे.
* तळहाताएवढ्या आणि पेरभर जाडीच्या टिकीज बनवून घ्याव्यात.
* साधारणपणे अर्धातास फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवाव्यात.
* पसरट panमधे तेल-बटर टाकून क्रॅब केकस् दोन्ही बाजूंनी खरपूस शॅलोफ्राय करून घ्यावेत.
* ओनीअन रिंग्ज,लेमन वेजेस सोबत गरम गरम सर्व्ह करावेत.

जयश्री खराडे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment