Saturday, August 25, 2018

कच्च्या टोमॅटोंची चटणी ,आणखी एक सौम्य चवीचे विरुद्धाशन

🔷कच्च्या टोमॅटोंची चटणी🔷

१. पाच/सहा कच्च्या हिरव्या टोमॅटोच्या फोडी करून घ्या.
२. टोमॅटोच्या फोडी, हिरव्या मिरच्या (चवीनुसार), कोथिंबिरीच्या कापून छोट्या केलेल्या काड्या तेलावर परतून घ्या.
३. हे मिश्रण मिक्सरमध्ये शेंगदाण्याचे कूट आणि मीठ टाकून वाटून घ्या.
४.हिंग जिऱ्याची फोडणी द्या.

ही चटणी कशाबरोबरही खाऊ शकता.

🔷आणखी एक सौम्य चवीचे विरुद्धाशन🔷

कोबी/फ्लॉवर/दुधी/लाल भोपळा/मशरूम यांची दुधातील सुपे

१. एका भांड्यात चिरलेला कोबी, लसणाच्या दोन तीन पाकळ्या, कोथिंबिरीच्या काड्यांचे चिरून तुकडे, एक हिरवी मिरची कमीत कमी पाण्यात उकडून घ्या.
२. उकडलेल्या भाज्या गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
३. एका भांड्यात दूध घेऊन त्यात हे वाटण टाका.
४. मिश्रणात चवीनुसार मीठ टाका. आवडत असल्यास मीरपूड टाका. गॅसवर ठेवून उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.

सूप सर्व्ह करण्यासाठी तयार!
लाल भोपळा/मशरूम/कोबी/फ्लॉवर यांची सुपे अशाच रीतीने तयार करता येतील.

©डॉ.वसंत काळपांडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment