Monday, August 27, 2018

हिरव्या मिरचीचा ठेचा,फोडणीचा झुणका


🔷फोडणीचा झुणका🔷

साहित्य

दीड वाटी हरभरा डाळ 
४ ते ५ कांदे
६ ते ७ हिरव्या मिरच्या
८ ते ९ लसूण पाकळ्या
१/३ इंच आलं
१ चमचा जिरे
१चमचा मोहरी
१ चमचा हळद पूड
१/२ हिंग पावडर
कडीपत्ता 
कोथिंबीर
१ मोठा चमचा फोडणी साठी तेल
चवीनुसार मीठ

कृती

*प्रथम हरभरा डाळ ८ तास भिजवून घ्यावी.
*भिजलेली डाळ पाणी न वापरता मिक्सर मधून थोडी मोठी मोठी वाटून घ्यावी.
*नंतर वाटलेली डाळ मुटके करून मोदक पात्रात चांगली उकडून घ्यावी.
*उकडलेली डाळ गार झाल्यावर पुन्हा एक एक मुटका मिक्सर मधून फिरवून घ्यावा. डाळ छान बारीक होते.
*मिरच्या, आलं, लसूण, थोडा कडीपत्ता, चिमूटभर जीरे मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.
*कांदे बारीक चिरून घ्यावा.

*नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेऊन बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंग होई पर्यंत परतून घ्यावा नंतर त्यात मिरची-आल्या लसणाच वाटण परतून घ्या नंतर जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग, हळद पूड टाकून परतुन घ्यावे.
*हे सगळं झाल्यानंतर आत्ता बारीक करून घेतलेली डाळ, मीठ, कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे.
*थोडा वेळ झाकण ठेवावे आणि झाला फोडणीचा झुणका तयार.

टीप-हा झुणका १ ते २ दिवस चांगला राहतो, प्रवास करताना चपाती सोबत घेऊन जाऊ शकतो.

🔷हिरव्या मिरचीचा ठेचा (खरडा)🔷

साहित्य:
हिरव्या मिरच्या
आलं
सुके खोबरं
कोथिंबीर
तेल

कृती:
*मिरच्या स्वच्छ धुवून घ्याव्या.
*देठ काढून स्वच्छ पुसून घ्याव्या.
*देठ काढलेल्या मिरच्या तव्यावर तेल टाकून छान भाजून घ्याव्या.
*नंतर त्यामध्ये लसूण, सुकं खोबरं, थोडंसं आलं, कोथिंबीर घालून जरासं परतून घ्यावे.
*सगळं एकत्र मिक्सरमध्ये मोठं मीठ घालून बारीक करून घ्या.
*झाला ठेचा तयार!!
माझी आजी, आई मातीच्या छोट्या मडक्याने बारीक करायच्या.

टीप-तव्यावर आपण बत्त्याने सुध्दा बारीक करून घेऊ शकतो.

सौ.वैशाली वेटाळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment