Saturday, August 25, 2018

लिंबू भात

🔷लिंबू भात🔷

साहित्य

तांदूळ, टोमॅटो, गाजर, तेल, जिरे, हळद, पावभाजी मसाला (मला आवडतो म्हणून टाकलेला) हिरवी मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, मीठ ,एक लिंबू...

कृती:

१.तांदूळ धुवून घ्यावा.
२टोमॅटो, गाजर कापून थोडंसं तेल टाकून जिरे हळद मसाला, कडीपत्ता टाकून वाफवून घ्यावे. ३.तांदळाच्या दुप्पट पाणी टाकून गरम होऊन द्यावा.
४. त्यात टोमॅटो अन गाजर ची आहुती द्यावी. मस्त उकळी आली कि त्यात तांदूळ सोडून मीठ टाकून थोडं ढवळून घेऊन त्यातच एक अख्खं लिंबू पिळून टाकावे.
५.दहा एक मिनिटे बारीक गॅस वर शिजू द्यावं.नंतर गॅस बंद करून खायला घ्यावे.
आपापल्या जबाबदारीवर प्रयोग घरी करावा. मी आज पहिल्यांदा केला अन मस्त झाला बाकी तुमच्या हाताच्या चवीवर अवलंबून...

स्वप्नील बामणे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment