घी राईस आणि ग्रेव्ही:
साहित्य:
तयार बासमती तांदळाचा भात,
फोडणीचे साहित्य,
काजू,
कढीपत्ता,
हिरव्या मिरच्या,
लसूण,
कांदा उभा चिरून,
कोबी,गाजर,
कांद्याची पात,
मटार
कृती:
१.प्रथम बासमती तांदुळाचा सुट्सुटीत भात करून ताटात पसरवून ठेवावा.
२.थंड भात फोडणी मिक्स करून नंतर गरम करावा नाहीतर गिच्चा होतो.
३.फोडणी साठी कढईमधे तेल गरम करावे. घी राईस असला तरी भाज्या परतण्यासाठी मी तेलच वापरते.
४.त्यामधे काजू तळून बाजूला काढून ठेवावेत. ५.तेलामधे जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या, लसूण टाकावा.
६.नंतर उभा चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यातच गाजर, कोबी,हलके परतावे. मी लाल कोबी घेतला आहे. नेहमीचाही चालेल. हवं तर बारीक चिरलेली कांद्याची पात, थोडेसे मटारदाणेही टाकू शकता.अगदी किंचितसे मीठ टाकावे.
७.नंतर मोकळा केलेला भात हलक्या हाताने मिसळावा.
भरपूर तूप घालावे. चवीनुसार मीठ घालून सगळीकडे लागू द्यावे. वरून तळलेले काजू व कोथिंबीर घालून सजवावे.
ग्रेव्ही:
ग्रेव्हीसाठी साहित्य:
२कांदे
१टोमॅटो,
५-६पाकळ्या लसूण,
आलं, काळे मिरं,जिरे पावडर, धणे पावडर,बदाम,लाल तिखट
कृती:
१.कांदे बारीक ,टोमॅटो चिरून घ्यावे.२.भांड्यात तेल गरम करावे.
३.त्यात कांदा चांगला लालसर भाजून घ्यावा.
४.कांदा थंड झाल्यावर त्यामधे ५-६ पाकळ्या लसूण ,१/२ इंच आल्याचे बारीक तुकडे, ४-५ काळे मिरे, १/२च.जिरे पावडर, १/२च.धणे पावडर, १वेलदोडा, ४बदाम(यामुळे ग्रेव्हीला एक सॉफ्ट टेक्स्चर येते),लाल तिखट १च. बारीक चिरलेला टोमॅटो सगळे एकत्र मिक्सरमधे चांगले वाटून घ्यावे.
५.नंतर भांड्यात तेल गरम करून वरील वाटण थोडावेळ चांगले परतावे.
६.पाणी व चवीनुसार मीठ घालून चांगली उकळी येऊ द्यावी. दाटसरच ठेवावे. ही ग्रेव्ही घी राईस बरोबर सर्व्ह करावी.
वरीलप्रमाणे बनवलेले दोन्हीही थोडे सौम्य आहे. हवे तर थोडे तिखट बनवू शकता.
डॉ. अस्मिता भस्मे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment