🔷गवारीचं भरीत🔷
कोवळी,हिरवी छान नाजूकशी गवार किती किती दिवसांत पाहिलीही नाही...(केंव्हा बघेन ठाऊक नाही)...
उपलब्ध होणारया गवारमधून निवडून निवडून बरीशी शोधून आणि बाकीची अगदी बारीक चिरून चटणी नाही तर स्वाहा...😳
म्हणून हा सगळा खटाटोप...
साहित्य :
जरड(जून) गवार, हिरवी मिरची, लसूण/आले लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, हळद,तिखट,मोहरी,कोथिंबीर,मीठ,तेल.
कृती :
* गवार आणि मिरची थोड्या पाण्यात शिजण्यास ठेवावी.
* बोटचेपी झाल्यावर पाणी निथळून घ्यावे आणि छान स्मॅश करुन घ्यावी.
* कढईत थोडं जास्त तेल तापल्यावर मोहरी टाकावी, तडतडली कि फक्त लसूण/आलं लसूण पेस्ट परतून घ्यावी.
* कांदा अगदी एकच मिनिटं परतून घ्यावा आणि हळद,तिखट घालावे.
* गवार पण २ च मिनिटे परतावी.
* गॅस बंद करावा.
* कोथिंबीर पसरून गरम गरम खायला घ्यावी.
थोडासा ट्विस्ट पण खूप झणझणीत ,मस्त टेस्ट लागते...
जयश्री खराडे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment