🔷गुलाबजाम🔷
गुलाबजामुन हा बहुतेकांचा लाडका पदार्थ. व्यवस्थित जमले तर या सारखी शाही डिश नाही.
साहित्य-
गव्हाचे पीठ,खवा, साखर,तळण्यासाठी तेल
कृती-
कुठलाही पदार्थ बनवताना चवीबरोबरच आरोग्यासाठी अहितकर असणाऱ्या गोष्टी टाळण्याकडे माझा कल असतो. म्हणून मी गुलाबजामुनमध्ये मैदा कधीच वापरत नाही... गव्हाचे पीठ वापरते.अतिशय चविष्ट बनतात.पण मैद्यापेक्षा सॉफ्ट्नेस कमी असतो. मी सोडाही वापरत नाही. यावेळी गुलाबजामुन करताना माझी छोटी म्हणाली मला बाहेर मिळतात तसे लुसलुशीत जामुन पाहिजेत.(मग माझा इगो थोडा हर्ट झाला😅).मग कसे करायचे हा विचार करत खवा घेतला १५ मिनिट चांगला फेटला. अगदी थोडेसेच...फक्त गोळे वळवता येईल एवढेच गव्हाचे पीठ घातले... एकीकडे साखरेची पाक तयार करण्यास ठेवला. तेल पूर्ण गरम करून त्यात गोळे सोडून मंद आचेवर तळून गरम गरम पाकात टाकले. छोटी वाटच बघत होती... खाण्यासाठी तिची घाई चालली होती. तिला सांगितले ४ तास तरी मुरायला लागतील तेव्हा उद्या सकाळ पर्यंत वाट पहावी लागेल. पण तासाभराने जेवायला बसताना पाहीले तर जामुन आणि पाक यांची गट्टी कधीच जमली होती... टम्म फुगले होते. यावेळचे खूपच मऊ आणि लुसलुशीत झाले होते.
नक्की करुन बघा आणि कळवा.
डॉ. अस्मिता भस्मे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment