🔷कणकेची खीर🔷
साहित्य:
कणीक अर्धा वाटी,साखर किंवा गूळ पाव वाटी,दूध अर्धा लिटर,वेलदोडे पूड,थोडी खसखस, खारीक पूड,सजावटीसाठी सुका मेवा
कृती:
कणीक कोरडी भाजावी. गुलाबी रंग आला की तूप घालावे.१ वाटी पाणी कणकेत घालून घोटावे.गुठळी नको.उकळी आली की त्यात दूध घालावे. वेलची पावडर घालावी, खसखस भाजून घालावी. खारीक पूड घालावी. साखर घालावी .गूळ घालायचा असेल तर गॅस बंद करून घालावा.
पाककृती-साभार-सौ. सुनीता मिरासदार (एक गहू,प्रकार बहू या पुस्तकातून)
डॉ.अर्चना चव्हाण
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment