Saturday, August 25, 2018

कुरमुरे लाडू

कुरमुरे लाडू

साहित्य:

कुरमुरे,
गूळ(चिक्की चा असेल तर उत्तम),
थोडंसं तूप.

कृती:

१.जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत थोडंसं तूप घ्यावे.
२.गॅस बर्नर चालू करावा.
३.गूळ बारीक करून पातेल्यात टाकावा ,हलवत राहावा म्हणजे पटकन पातळ होईल .
४.त्याला उकळी यायला लागली की कुरमुरे पाकाच्या बेताने घालावेत.मिश्रण हलवत रहावे,सगळे कुरमुरे पाकात भिजलेले असतील तर पातेले खाली उतरवावे.
५.पटकन हाताला व थाळीला तूप लावून लाडू वळावेत.
महत्त्वाचं-पाकाची परीक्षा- पाण्यात जर गोळी होत असेल तर पाक झाला असं समजायचं.पाकपरीक्षा करताना पातेलं गॅस वरून खाली उतरवावे.

* कुरमुरे पचण्यास हलके असतात व गुळात लोह असते. त्यामुळे हे लाडू खेळकर वयातील मुलांची मधल्या वेळेच्या खाण्यात असायला पाहिजे अशा ऊर्जेची गरज भागवतात. *

डॉ.अर्चना चव्हाण

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment