🔷कोहळयाची कोशिंबीर🔷
साहित्य
१ कोवळा कोहळा
२ चमचे शेंगदाणे कूट (आवडत असेल तर जास्त घेऊ शकता )
२ चमचे ताजे दही
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
चिमूटभर जिरे
चिमूटभर मोहरी
२ चमचे फोडणी साठी तेल
कृती
प्रथम कोहळा किसून घ्यावा, किसलेले कोहळा थोडे पाणी घालून स्वच्छ धुवून करकरीत पिळून घ्यावा,
नंतर एका भांड्यात कोहळा मोकळा करून घ्यावा, त्यामध्ये शेंगदाणे कूट, दही, मीठ, कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्यावे,
नंतर त्यामध्ये मिरची, जिरे,मोहरी ची फोडणी करून घ्यालावी व चांगले मिक्स करून घ्यावे.
खावयास तयार कोहळा कोशिंबीर!!
टीप
कोहळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण जे कोहळा करकरीत पिळून पाणी काढतो ते पाणी न फेकता भाकरी करण्यासाठी वापरावे.
सौ. वैशाली वेटाळे.
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
अवकाडोची कोशिंबीर (ग्वाकामोले उर्फ ग्वाक)
हा मुळचा मेक्सिकन पदार्थ अमेरिकन जनतेने आपलासा केलाय. आपल्याकडील मसालेभात आणि पुलावाचा सख्खा भाऊ शोभेल अशा ‘बरीटो’भाताबरोबर ही हवीच हवी. पण तसेही थंडीच्या मोसमात ही कोशिंबीर पौष्टिक म्हणून अवश्य खावी असे इकडचे आहारतज्ञ सांगतात.
आधी हे रायते मी इकडच्या हॉटेलमध्ये चाखले. आवडले म्हणून घरी करुन पाहिले. तुम्हाला अवकाडो फळे मिळाली तर जरूर करुन पहा. आपल्याकडच्या कवठाच्या गरासारखीच पण थोडी निराळी चव ह्या फळाच्या गराला असते.
साहित्य:
२ पिकलेली अवकाडो फळे, १ छोटा कांदा, १ लालबुंद टोमॅटो, वाटीभर कोथिंबीर, दोन मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, २ लसूण पाकळ्यांचा ठेचा (ऐच्छिक), मीठ (चवीनुसार)
कृती:
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरच्या हे सर्व बारीक चिरून घ्यावे.
अवकाडो फळाचे दोन तुकडे करावेत. आतली बी काढून टाकावी आणि चमच्याने फळातला सगळा मऊ हिरवागार गर खरवडून एका वाडग्यात काढून घ्यावा. त्यावर लगेच लिंबाचा रस ओतावा म्हणजे गराचा रंग बदलणार नाही. आता सगळा गर आणि मिरच्या, कोथिंबीर (पाट्यावर/ रगड्यावर किंवा मिक्सरवर ) एकत्र करुन चटणी प्रमाणे दाट वाटून घ्यावे. वाटलेल्या मिश्रणात कांदा, टोमॅटो, लसूण ठेचा आणि शेवटी मीठ घालून कालवून घ्यावे की झाली कोशिंबीर तयार.
© सौ. प्रीति कामत-तेलंग
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment