गाजर केक
साहित्य
१.५ कप किसलेले गाजर,
१.५ कप मैदा,
३ टेबलस्पून बारीक रवा,
पाऊण कप कॅस्टर शुगर,
पाऊण कप ब्राऊन शुगर,
१.५ टिस्पून बेकींग पावडर,१ टिस्पून बेकींग सोडा,
अर्धा कप लोणी/ अनसाल्टेड बटर,
अर्धा कप गोड दही,
अर्धा चमचा दालचिनी पूड,१/४ चमचा जायफळाची पूड,
३-४ तास पाण्यात भिजवलेले किसमिस,ड्रायफ्रुट्स आवडीप्रमाणे (अक्रोड मस्तच वाटतात),
गरजेप्रमाणे दूध,
किंचित मीठ.
कृती :
*ओव्हन प्रिहीट करावे.
*एका भांड्यात आधी मैदा, रवा, बेकींग पावडर, बेकींग सोडा, दालचिनी जायफळ पूड,मीठ चाळून घ्यावे.
* एका मोठ्या बाउलमध्ये लोणी आणि दोन्ही शुगर्स घेऊन चांगले फेटून घ्यावे.
* दही टाकून व्यवस्थित मिक्स करावे.
* त्यात गाजर , ड्रायफ्रुट्स हलक्या हाताने मिक्स करावे.
* मैदा-रवा थोडा थोडा मिक्स करत केकचे बॅटर बनवून घ्यावे.
साधारणपणे भजीच्या पीठाइतकी कन्सीस्टँसी असावी.
* केकच्या भांड्याला सर्व बाजूंना मैदा भुरभुरावा, एक प्रकारे कोटींग करून घ्यावे.
* बॅटर भांड्यात ओतून एकसारखे करून घ्यावे,थोडंसं टॅप करावे.
* आवडत असल्यास वरून आणखी थोडे ड्रायफ्रुट्स पसरावेत.
* ओव्हन १८०°c वर सेट करून साधारणपणे ४०-४५ मिनीटे केक बेक करुन घ्यावा.
* टूथपिक ची टेस्ट घेऊन केक ओव्हनमधून काढून थंड होऊ द्यावा.
* थोडेसे जाडच काप करून घ्यावेत.
* आवडत असल्यास यावर क्रिम चीझ+कॅस्टर शुगर चे कोटींग करु शकता.
खरंतर या केकची खरी मजा गरमागरम कडवट न् कडक कॉफीसोबतच...
पण... अस्मादिकांना चहाशिवाय गंमत नसल्याने मसाला चहाचंच प्रयोजन..☕.
जयश्री खराडे.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment