Sunday, August 19, 2018

पाईनॅपल कप केक

🔷पाईनॅपल कप केक🔷

साहित्य:

1.१वाटी दही(आंबट नको फार),
अर्धी वाटी तेल,
अर्धी वाटी पिठीसाखर,
४ते५ थेंब अननसाचा इसेन्स,पाईनॅपल क्रश ४चमचे(पोहे खाण्याचा चमचा)
सव्वा वाटी बारीक रवा,
सोडा,किंचित मीठ,व्हिनेगर

१. दही, तेल,पिठीसाखर,पाईनॅपल इसेन्स, पाईननॅपल क्रश सगळं नीट फेटून एकजीव करून घेणे.
२.रवा(किंचित गरम करून मिक्सर च्या छोट्या भांड्यात घालून फिरवून घ्यावा)१छोटासा चमचा सोडा,किंचित मीठ घालून एकत्र करून घ्यावे.
३.वरील१ मधील ओल्या मिश्रणात रव्याचे मिश्रण थोडे थोडे करून टाकणे.
४.यात खाण्याचा रंग टाकू शकता.
५.सगळं मिश्रण नीट एकजीव करून घेणे.६.सगळ्यात शेवटी एक छोटा चमचा व्हिनेगर टाकून नीट फेटून घ्यावे.
७. मोठ्या आचेवर कढई गरम करायला ठेवावी ( झाकण ठेवावे).
१० मिनिटानंतर आच मंद करावी .
८. केक मोल्ड ला तेलाचा हात लावून ग्रीस करून घ्यावे मग केक च मिश्रण केकमोल्ड मध्ये घालून साधारण २५ ते ३० मिनिटं बेक करावे. मध्ये एकदा सुई घालून चेक करावे.९. या प्रमाणे इतर क्रश वापरून कपकेक ही छान होतात...

शर्वरी पदे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment