स्टफड् पोटॅटोज्
"Jacket potato"...
इथे खूप जास्त फेमस असलेला पदार्थ..
(गरगरीत मोठ्या सालासकट बटाट्याला चार चिरा देवून सिझनड् चीझ,प्रोसेस्ड् चीझ,चेद्दार असे ३-४ टाईपचे चीझ भरून तो बेक करतात... दिसायला मस्त दिसतं...मग त्याच्यावर मिरेपूड,हर्बज्,चिली फ्लेक्स आणि साल्सा/मेयॉनीज डिपसोबत खातात.)
मी पण खाल्ला...पण माझ्या चटोऱ्या जिभेला ते गणित तितकंस.. बरचंसं.. नाहीच जमलं अन् मला ते चेद्दार चीझ नाहीच आवडत. मग घरीच आपल्याला रूचेलसा कारभार करायचा ठरवला.
घरी वाटीभर उरलेले काबुली चणे होते.. मग चक्र सुरू.. सगळीच, मी ओट्याजवळ आणि
MP3 वर "घर"...
"आपकी बातों मे फिर कोई शरारत तो नही..
बेवजहा तारीफ करना,आपकी आदत तो नही."
पण मला काही करून माझ्या डिश ची तारीफ ऐकायचीच होती...
So here I go...
साहित्य :
मध्यम आकाराचे लंबगोल बटाटे, भिजवलेले काबूली चणे(याऐवजी वाफवलेले मक्याचे दाणे पण चालतील), बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, किसलेले आले, बारीक चिरलेली शिमला मिरची,बारीक चिरलेली कांद्याची पात, लिंबू रस,चिली फ्लेक्स, लाल तिखट, मिरेपूड,मिक्सड् हर्बज्, पूर्ण पाणी निथळून गेलेले दही (हंग कर्ड),olive oil,मीठ.
कृती :
*भिजलेले चणे १० मिनीट गरम पाण्यात ठेवावेत,मग उपसून निथळून घ्यावेत.
* पूर्णपणे निथळल्यावर बेकींग ट्रेमध्ये पसरवून या चण्यांना तिखट,मीठ, हर्बज् , लिंबू रस आणि तेल चांगले चोळून घ्यावे.
* प्रिहीटेड ओव्हनमध्ये आधी १८०°c वर ७-८ मिनीटे आणि १२५°c ला १०-१२ मिनीटे ठेवावे. आपल्याला हे चणे कुरकुरीत बनवायचेत.
* बटाट्याची साले काढून (आवडत असल्यास तशीच ठेवून) स्कूपर ने मधला गर काढून घ्यावा. ब्रश ने बटट्याला सगळीकडून तेल लावून घ्यावे.
* रेडी झालेले चणे एका बाऊल मध्ये काढून घ्या, बेकींग ट्रेमध्ये बटाटे ठेवून १०-१५ मिनिटे बेक करावेत.
* कांदा, टोमॅटो,शिमला मिरची, हर्बज,मिरेपूड,फ्लेक्स, लिंबूरस,मीठ,तेल अस ड्रेसिंग तयार करून घ्या. चण्यांवर हे सगळ ओतून छान एकजीव करून घ्यावे.
* बेक झालेल्या बटाट्यांमधे हे मिश्रण दाबून भरून घ्यावे.
* हंग कर्डमधे थोडी साखर टाकून फेटून घ्यावे.
या दह्याचा चमचाभर गोळा स्टफड् बटाट्यांवर ठेवावा.वरुन बारीक नाजूक चिरलेली हिरवी गार कांद्याची पात.. इतकी सुंदर दिसते रंगांची जुगलबंदी.😍
* खायला तयार...
सोनेरी रंगाचा आवडता बटाटा..ते कुरकुरीत चणे...कांदा टोमॅटो ची चव आणि जिभेवर विरघळणारे दही..
कित्ती ते कौतुक ..😊
सांगा तुम्ही कशी वाटली डिश...
जयश्री खराडे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment