Sunday, August 19, 2018

पातोळ्या

🔷पातोळ्या🔷

साहित्य:

*हळदीची पाने
*तांदळाचे पीठ
*गूळ
*ओलं खोबरं
*वेलची
*तूप

कृती:

१.हळदीची पाने स्वच्छ धुवून दोन तुकडे करून पाणी निथळायला ठेवणे. तांदळाच्या पिठात मीठ आणि पाणी घालून पानावर पसरता येईल इतक सैल भिजवून घेणे.
२.ओल्या खोबऱ्यामध्ये गूळ घालून कढईत परतून चुन करुन घेणे.
३. त्यामध्ये तूप व वेलची पावडर टाकणे. कढईत पाणी गरम करायला ठेवणे.
४.पानावर पीठ पसरवून मधे खोबऱ्याचा चुन घालून दुमडून ठेवणे.
५.अशी पाने चाळणीत ठेऊन कढई मध्ये ठेवून झाकण ठेऊन वाफवून घेणे,अळूवडी प्रमाणे...

गरम गरम पातोळ्या खायला मस्तच लागतात.
ही पारंपरिक पाककृती आहे.

वंदना मंकिकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment