🔷मटणाचं लोणचं🔷
साहित्य
१किलो मटण
१००ग्राम सुके खोबरे
१००ग्राम उभा पातळ चिरलेला कांदा
*कांदा आवडत नसेल तर आपण १० ते १२अख्खा लसूण पाकळ्या वापरू शकतो
५० ग्राम पांढरे तीळ
४ते५हिरव्यामिरच्या अख्ख्या
१ चमचा तिखट
चवीनुसार मीठ
५ ते ६ मोठे चमचे तूप/तेल
कोथिंबीर सजावटी साठी
कृती
प्रथम मटण एका भांड्यात स्वच्छ धुवून बाजूला नितळ लावावे.
नंतर गॅस वरती ठेवलेल्या भांड्यात तूप चांगले गरम करून घ्यावे, व त्यामध्ये उभा चिरलेला कांदा चांगला लालसर होई पर्यंत परतून घ्यावा. कांदा चांगला परतल्यानंतर मिरचीला मधून उभे काप देऊन कांद्या सोबत परतून घ्यावी, नंतर सुके खोबरे (पण उभट किसून घ्यावे) तीळ घालून परतून घ्यावे, १ चमचा तिखट घाला ( लालसर रंग येण्यासाठी), नंतर स्वच्छ धुवून ठेवलेले मटण घालून चांगले वरखाली करून चवीनुसार मीठ घालून गॅस मंद आचेवर ठेवून मटण चांगले मऊ होईपर्यंत झाकण ठेवून वाफवून घ्यावे .(५ मिनिटांनी झाकण उघडून जरा वरखाली करून घ्यावे)
१५ ते २० मिनिटांत तयार होते.
महत्त्वाचं...
पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही
फक्त मिठाच्या पाण्यात शिजते
हे ५ते ६ दिवस टिकते.
*टीप*
*लोणचं जर आज खावयाचे असेल तर ते आधी किमान ५ ते ६ तास करून ठेवावं लागतं मुरण्यासाठी...
तुपात चांगलं मुरलं की छान चव येते.
*लसूण वापरून केलेले लोणचं १ दिवस आधी करावे फार सुंदर चव येते.
*लसूण वापरून केलेल्या लोणच्यामध्ये हिरवी मिरची वापरायची नाही.
*चवीनुसार तिखटाचे प्रमाण वापरावे.
सौ. वैशाली वेटाळे.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment