Saturday, August 25, 2018

दुधाची मसाला आमटी

🔷दुधाची मसाला आमटी🔷

साहित्य

१/२ लिटर दूध 
(पाणी न घालता म्हशीचे दूध घेणे)
दीड वाटी नारळाचे दूध ( एका नारळाचं निघतं )
लसूण पाकळ्या ६ ते ७,
आलं बोटाच्या एका पेरा एवढं,
पांढरे तीळ १ मोठा चमचा ( भाजून घ्यावे ),
ओलं खोबरं थोडंसं,
कोथिंबीर,
कडीपत्ता,
मीठ
फोडणी करता मोठे २ चमचे तेल
लाल तिखट २ चमचे ( चवीनुसार तिखट वापरावे ),
थोडासा गूळ,
१ बटाटा बारीक चिरून.

कृती:

◆ प्रथम मसाला तयार करून घ्यावा ( लसूण, आलं, तीळ, ओले खोबरे, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कडीपत्ता याचं वाटण )
◆ नंतर एका पातेल्यात म्हशीचे दूध प्रथम उकळी करून घ्यावे. नंतर त्यात हळूहळू नारळाचे दूध घालून एक सारखं हलवत एकच उकळी काढावी. 
◆ दुसऱ्या पातेल्यात तेल गरम करून घ्यावे त्यामध्ये कडीपत्ता, लाल तिखट (चटणी), मसाला वाटण घालून चांगला तेल सुटे पर्यंत मसाला परतून घ्यावा. बारीक चिरलेला बटाटा टाकावा.(उकडून घेतला तर छानच)
◆ मसाला चांगला परतल्यावर त्यामध्ये हळूहळू कोमट झालेले दूध ओतावे आणि एकसारखं पळीने हलवत उकळी काढावी.
(दुधाची आमटी असल्याने एक सारखं दूध हलवत रहावं लागतं नाहीतर दूध फुटतं )
◆ जास्त वेळ ही आमटी उकळत नाही ठेवायची.
◆ नंतर पातेलं खाली उतरून कोमट झाल्या नंतर त्यामध्ये मीठ टाकावे. वरून कोथिंबीर भुरभुरावी.
◆ झाली आमटी खावयास तयार !!

सौ. वैशाली वेटाळे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment