🔷मेथीची भाजी🔷
(पीठ पेरून)
साहित्य :
धुवून निथळून घेतलेली मेथी,बेसन,बारीक चिरलेला कांदा-लसूण-मिरची,हळद,तिखट,मीठ,तेल.
कृती
* कढईत तेल तापलं की लसूण -मिरची परतून घ्यावे.
* मग कांदा घालावा, छान परतला की चवीप्रमाणे मीठ , तिखट घालावे
* मेथीची भाजी टाकून मिक्स करून, मेथीची भाजी शिजू द्यावी.
* भाजी शिजत आली कि, बेसन घालावे,चांगले परतून घेऊन गरज वाटली तर किंचित पाण्याचा हबका मारावा.
* झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यावी.
गरम गरमच पोळी-भाकरीसोबत मस्त मस्त खावी..
सोबत लोणच्याची फोड नि ताक...
जयश्री खराडे.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment