🔷सुरनळी🔷
साहित्य:
तांदूळ, ओले खोबरे, गूळ, मेथी दाणे थोडेसे, थोडेसे पातझळ पोहे, थोडी हळद,मीठ
कृती-
तांदूळ आणि मेथी संध्याकाळी भिजत घालावेत. रात्री तांदूळ,मेथी, खोबरे बारीक वाटून घ्यावेत. नंतर त्यात पातळ पोहे धुवून घालावेत. हळद घालावी. सकाळी त्यात गूळ, चवीपुरते मीठ घालून डोशाप्रमाणे काढावेत. (तव्यावर पीठ घालून वर तूप घालावे व झाकण ठेवावे.) उलटू नयेत.
टीप-माझी आई यात कलिंगडचा सफेद भाग किंवा तवशे किंवा मग्गे रात्री वाटताना घालते. त्यामुळे जास्त मऊ होतात आणि जाळी
चांगली येते. पाणी कमी घालावे;कारण कलिंगडाला पाणी सुटतं.तसेच सकाळी गूळ घातल्यावरही पीठ पातळ होऊ शकतं.
रिमा मंकीकर
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment